Thursday, August 19, 2010

सुंदरतेच्या जगात

सुंदरता!
कोणी केली ह्याची व्याख्या? खर तर प्रत्येकाच्या लेखी ती वेगळीच असते.
आणि ती त्यांच्या विचारावर अवलंबून असते. तर का? जो जसा विचार करेल तसा तो समोरच्याची सुंदरता बघेल. मग ती चेहऱ्याची असो वा शरीराची असो वा मनाची असो.
पण मला नेहमी वाटते की खरच का समोरच्याच मन जिंकण्या साठी चेहऱ्याची किवा शरीराची सुंदरता महत्वाची असते? तस तर प्रत्येक वयात एक वेगळीच सुंदरता असते.

   जसे लहान मुलात पहिला तर त्याची खरी सुंदरता असते ती त्याच्या निरागसतेत, किती छान असते ती, फत्त एक सेकंदासाठी डोळे मिटा आणि बघा गोड बाळ डोळ्या समोर येईल आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता किती छान. कती निरागस.
 
   नंतर मग सुंदरतेची व्याख्या बदलते आणि खरी सुंदरता समजते, ती तरुण वयात, मग ती नेहमीच हवी हवी वाटते वेग वेगळ्या रुपात. तरुण वयात आपण खुप वेळा चेहऱ्याच्या सुंदरतेला महत्व देतो अन ते स्वाभाविकच असते, त्यात पण एक वेगळाच आनंद असतो आणि जस म्हणतात तरूणवय परत कधीच येत नसत अगदी तसच त्या वयातली सुंदरता परत कधीच येत नाही.
  नंतर मग उतार वयातली सुंदरता. आणि तुम्हाला माहित आहे मला ही सुंदरता खुप आवडते, त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, ते पिकलेली केस, ते थकलेल शरीर, ते काय सांगत असतात तर अनुभव, ते सांगत असतात त्यांनी बघितलेली तितकी वर्षे आणि त्यांनी जगलेला प्रत्येक क्षण.
   अश्या माझ्या व्याख्या आहेत सुंदरतेच्या, म्हणून म्हणतात “बघणाऱ्याच्या डोळ्यात सौंदर्य असते” खरच ते असते. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,
कितपत योग्य आहे बाह्य सुंदरता बघणं?  मनाची सुंदरता महत्वाची, मन जितक सुंदर तितक जग सुंदर, आणि तीच व्यक्ती सर्व जगाला जिंकू शकते, आणि हो त्या व्यक्तीला मग बाह्य सुंदरता महत्वाची वाटत नाही.  मग परत एक विचार येतो मनात, आपण बाह्य सुंदरते कडे लक्ष द्याचच नाही का? पण नाही ती पण महत्त्वाची आहे कारण आपल दिसणं, बोलणं, वागणं महत्त्वाच आहे म्हणून मी स्वःता च्या बाह्य सुंदरतेला बघते कारण छान राहण्याने आपल मन प्रसन्न रहाते, पण पुन्हा तेच ते एका सिमेपर्येंत.
  मी नेहमी माणसांच्या मनाच्या सुंदरतेला जाणून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे मग मला त्या माणसांणच्या सोबत वागायला, बोलायला त्रास तसा होत नाही आणि मग त्यांच्या मनाच्या सुंदरतेला महत्व दिले की मी आपोआपच मानाने सुंदर लोंकाचा सहवास असते आणि मग माझ मन अजून सुंदर होते, आणि कोणी अस म्हंटल की आजकल चंगल्या मनाचे लोकच कुठे सापडतात, तर ती माझा कडे सापडतात.

मनाची सुंदरता शब्दात नाही सांगता येणार
मनाची सुंदरता सुंदर मनालाच ओळखता येते.

तस जग खुप छान आहे, आपण ते बघीतल तर,
आपल्या बघण्याच्या दृष्टीत सार असत.

म्हणूनच जगाची सुंदरता बघायची असेल तर
दृष्टी बदलावी लागते, अन त्यात ती जमण महत्वाच.  

ज्याला जमल त्याने जग जिंकाल,
आणि जग जिंकणारा सर्वात मोठा विजेता.

अन तेच  मी मझ्या ह्या लहानश्या आयुष्यात
प्रयत्न करते तो मोठा विजेता होण्याचा.

माहित आहे ते तेवढ सोप नाही
अशक्य पण तर नाही ना.


....पिनल चौधरी
Tuesday, August 17, 2010

मनोमिलन....

कसे सांगू मी काय वाटत, त्याच्या सोबत असतांना,
जगात अशी कुठली जागा नाही, आणि अशी कुठली वेळ नाही.
का होत असाव अस, रोज असा प्रश्न स्वतःलाच विचारते,
आणि मग मला त्याच्या कडेच उत्तर सापडत.

मग कधी वाटत हा सर्व मनाचा खेळ आहे,
मग वाटते नाही कदाचित त्याच्यातच काही तरी आहे,
पण मग मनाला समजावते,
तूच भानावर नाहीस.

पण मी माझ्या मनाला का दोष द्यावा?
त्याचच मन माझ्या मनाच्या प्रेमात पडल असेल.
आणि लोक म्हणतात ती त्याच्या प्रेमात पडली.
पण माणूस मुळात कोणाच्या प्रेमात पडतच नाही, मनं पडतात.....  


....पिनल चौधरी

Friday, August 13, 2010

प्रेमाची भाषा

  त्याच्या प्रत्येक शब्दात इतक प्रेम असते की,
खरच मला शब्द शोधण काठीन होऊन बसते.


मग ते प्रेमच शब्द होऊ लागतात,
अन प्रेमाची भाषा निर्माण होते. 


...पिनल चौधरी

वेगळी काम... आजही असाच एक दिवस उगवला जसा रोज उगवतो, आणि असाच दिवस ज्यात आपण रोजची कामे करत असतो, आणि असा सहजच विचार आला मनात, का करतो आपण कारण लहानपणीच ती आपल्यला शिकवली जातात म्हणून ती अंगवळणी पडतात, की सर्व करतात म्हणून, पण कुणास ठाऊक नेमकी तीच काम करायचा मला कंटाळा येतो.
नाही तस नाही.... मला पण शिकवली गेली ती लहानपणीच पण एकच ती माझा अंगवळणी पडलीच नाही......पण मला वाटले का करावी ती कामे... अन वेगळी काम करून दाखवण्या साठीच, त्या माझ्या अंगवळणी नाही पडल्या कदाचित....
बरेच लोक म्हणतात वेगळ करून दाखवणं सोप नाही, त्यासाठी खुप कष्ट घ्यावी लागत, खुप मेहनत करावी लागते....आता मला सांगा वेगळ करून दाखवण्याची व्याख्या काय आहे?
वेगळी काम, अगदी कोणी नाही केली अशी काही तरी, की लोकांनी म्हणाव अस काय केलत...
छे..
वेगळी काम म्हणजे तुम्ही तीच काम करा जी सर्व करतात, म्हणजे तुम्ही तुमची कर्तव्य जरी केलीतना तरी चालेल.. आणि तीच काम आजकल वेगळी झाली आहेत... आणि त्याकडेच सर्व दुर्लक्ष करतात आणि मला तीच करून दाखवायची आहेतमी वेगळ अस काही करणार नाही, पण तीच काम अशी करीन जी कधीच कोणी त्या पद्धतीने केलीच नाहीत....  
आणि असच मला करून दाखवायच आहे.....वेगळी काम जी मी माझ्या पद्धतीने करणार...
आणि हो मला वाटत ही कठीण नाहीत.....   

Tuesday, August 10, 2010

मनाची भाषा

कविता करायचा छंद कधी जडला.....
मला ते कळलच नाही....

पण तो छंद नाही...
ती माझा मनाची भाषा आहे,

मनाला भाषेची गरज कधी भासते....
जेव्हा मनाला खुप बोलावेसे वाटते तेव्हा?

छे....

जेव्हा कोणी तरी मनात
घर करून बसलेल असत....तेव्हा,

त्याला बोलण्यासाठी भाषेची गरज भासते.....
कारण.... ती सर्वाना नाही कळत..... फक्त मनला कळते...

म्हणून त्याच मनला.....
त्या घर करून राहणाऱ्याला...

सांगायला लागते ती भाषा ....
कविता......

सूर्याचे उत्तर

एकदा मी सुर्याला विचारलं....
“तुला रोज तेच तेच काम करून कंटाळा नाही का येत?
कधी थांबावसं नाही का वाटत?
कधी बदल नको असतो का तुला?"


त्यावर सूर्य म्हटला......

“जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगायला लागतोना 
कधीच कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही...."


...पिनल चौधरी 

Thursday, August 5, 2010

वेग...


वेग....
सर्वांनाच वेगाची ओढ.....
सर्वांनाच धावायेचे आहे....
कोणाला ज्याच्या त्याच्या गरजांसाठी धावायेचे आहे.... काळजी म्हणून....
कोणाला फक्त वेग अनुभवायचा असतो...... कशाचीच काळजी न करता.....
कोणाला जग धावत म्हणून धावायेचे आहे......स्वतःची काळजी म्हणून.....
मोटार असलेले पण धावतात,
आणि सायकल वाले पण धावतात.....मोटार वाल्याच्या वेगात मिसळायला,
त्याला पण वेगच अनुभवायचा असतो का मोटार वाल्याचा की,
तो जगाच्या वेगा बरोबर चालत असतो......

पण..... का धावायच... त्याचा शोध कोणी घेतलाच नाही....

प्रेम....

प्रेम.. खरच
कस असतना आपल्याला न कळतच होत असत ते...
आणि आपल्या आधी समोरच्याला समजत असत..
ते कळत नाही कारण.. मन भानावर नसते .... की त्याला रहायचे नसते
सर्व कस छान वाटते...सर्व मना सारख होत असल्या सारखे वाटते....
आपण फक्त कोणसाठी तरी स्वतःला जपणं..... कोणी तरी आपल्याला स्वताहून विचारान
आणि आपण आनंदात सांगणं की मी मजेत आहे आणि मनात म्हणन(तुझा मुळे).....
खरच....
तास अन तास त्या व्यक्ती सोबत कशे संपतात काळत नाही.....
अन परत काहीच न मिळवल्याचा विचार येतो... आणि
खरच....
प्रेम गोड आनंद देणार सर्वाना हव हव वाटणारा असत.....
त्यात आपण नेहमी चांगल्या गोष्टी शिकत असतो,
त्या खरच प्रेमात पडल्यावरच शिकता येतात....
प्रेम...
कधी अस वाटत की शब्दात सांगणं कठीण आहे,,, आणि खरच ते कठीणच आहे,
ते प्रतेक्ष्यात अनुभवण जितका छान असत तितका ते वाचून ऐकून बघून नाही समजत...
प्रेम....
खरच काय असते ते ..... आपण कोणाला तरी आवडण आणि कोणी तरी आपल्याला आवडणे,
 बस एवढंच की अजून काही........


कविता करावी तर, शब्दांची गरज असते,
नुसते शब्द असून काय लिहावे, भावनांची जोड मनाला हवी असते,
नुसतच मन असल तरी, सुचन महत्वाच असत,
हे काहीतरी सुचण्यासाठी हळव हृदय असाव लागत,
हळव हृदयाच सांगणंही ऐकाव तस कोणाच असनही महत्वाच असत,
हे असण – नसणही कस असत....
मला मात्र तुझ्या कडे असलेल्या माझ मनाची गरज असते.....
कविता करण्या साठीच कदाचित.....
आणि कदाचीत अस सुचत कारण तुझा कडे माझ मन आहे म्हणून....Pinal

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...