Wednesday, September 29, 2010

तू उमगतच नाहीस...

तू उमगलास रे
तुझ्या रुपात..
पण ते जमवते आहे
माझा झालेल्या जगात...

समजलास... अस
वाटताच क्षणी पुन्हा
मला गोंधळात टाकतोस..
मन माझ मग हिरमुसत

ह्या समजुतीत
दूर नको लोटूस कधी
जमेल मला ही ते
जरी थोडीफार चुकली

बस मला तू आसपास
हवा आहेस
हाकेच्या अंतरावर
अंगणी मनाच्या

नको जाऊस हाके पलीकडे....
कारण मज ते नाही जमायचे
ओरडून सांगणे
तू दूर गेल्याचे..... 


...पिनल चौधरी!!!

तू अन मी

चल होऊयात बेभान ह्या चढ-उतारात
बेभान होऊन मग आपलाच कल पाहुयात

न काळोख रात्री न मंतरलेली दिवसं
ना त्यांची भीती ना त्यांचा धाकात जगणं

स्वतःचेच असेल तत्व आणि स्वतःचाच मंत्र
अन मग सहजच निभाऊ आपण जगण्याचे तंत्र 

कधी असेलही आपलाच कल चुकलेला
मग त्याला सावरुयात ना.. बघू कोणला आधी जमत

अश्या जमवा जमवीत बघ कसला असतो आनंद
आणि ह्यातूनच तर आपल्याला खर आयुष्य उमगत...



...पिनल चौधरी!!!

आशेची रांगोळी

आशेची रांगोळी,
ती कधीच पूर्ण होत नसते

तिच्या थेम्ब्बांना जोडण्याचा अट्टहास
माणूस उगीच करत असतो

कधी थेंब सापडतात पण
ते काही केल्या जुडत नाही

त्यांना जोडायचा प्रयत्न असला
तर मग ती रांगोळी दिसत नाही

पण रांगोळीची शोभा तर
तिच्या रांगांनी येते

मग माणूस थेंब जोडून पण 
पुन्हा रंग्गांच्य शोधात असतो..

त्यातून पुन्हा तोच प्रवास
सुरु होतो.... न संपणारा 


....पिनल चौधरी!!!!

Monday, September 27, 2010

खेळ आगीचा....

सोबतीला ना आनंद होता  
ना होते हसू
सारेच शोषिले मी
ते पीत अश्रू 

माझ्याच स्वभावाचा दोष तो
मी अश्रू पीतांना देखील
आनंदाश्रुंची व्याख्या
करत जगले

आरश्यात बघता  
उमगले मग
की स्वतःलाच गमवले
तर कुणास शोधते

मला हरवून जावेसे वाटते
माझ्याच विचारात असे
की कोणत्याच जुन्या विचाराने
मग त्यात डोकाऊ नये

 जळले इतके मी की
आत्ता आगच सोबती वाटते
आगीसोबत मग खेळ  
मांडून जिंकावेसे वाटते.

...पिनल चौधरी !!!

Friday, September 24, 2010

आज् दिल बहोत रोना चाहता था
पर दिलको इजाजत नही
उस दिलसे जो इसमे बैठा है.

मानाके थक गया वो
मनाके  स दिलको,
पर दिल है जो खुदको गावा बैठा है

अब क्या फायदा रोनेका
जब रोना चाहा ना रो सका
अब उसे आदतसी हो गयी है खुशियोन्की 


..पिनल चौधरी.

अस्तित्व


नको मला ती तूप रोटी
नको मला तो ताट चांदीचा  
कशाला थाट उगीच
मर्जीन खाऊ द्या 

स्फुरू दे मज आता
स्वतःच्याच विचाराने
कशाला आखावे जगणे 
दुसऱ्यांच्या नकाशाने  

हृदयातल्या जखमा
नको शब्दांत
सारे ठेऊन इथेच  
हवेसे वाटते आकाशी नजारे   


नको शिकाऊस मला देखावे बनवणे  
आयुष्याच्या उत्स्वातले
मला न जमणार ते कधीच
त्यात देखील माझे अस्तित्व चुकून झळकावे....


...पिनल चौधरी

Thursday, September 23, 2010

promise

Give me promise…….
That u never break any promise that u are giving and you’ll…
Because these promises becoming my breath n my breath will becomes your life.

वाट....

कोवळे दिस सरुनी जाती
नकळत त्याच्या अन माझ्या
परतुनी फिरतील ते कधी आता?

ऋतू ते सारेच सुगंधी वाटे,
त्याच्या प्रीतीच्या पावसात चिंब भिजे
परतुनी तो वारा कधी बहरेल?

गेला दूर देशी वेड लाऊनी
वेड देखील हवे वाटे
परतुनी येईल कधी माझ्या देशी?

वाट बघते न-मिटता डोळे
मिटताच क्षणी पानावते
पाणावलेले डोळे कोरडे होण्याआधी यावे!!!!!!

...पिनल चौधरी

Sunday, September 19, 2010

आयुष्य...... संकट सुटेना

आकाशात आहेत असंख्य तारे,
तशीच स्वप्न डोळ्यात असंख्य.

जिद्द उराशी बाळगून,
स्वप्नांसाठी लढणार आयुष्य.

संकटांच्या ढगात देखील
चंद्रासारखी लपणार नाही.

माझ्या नावेने तिचा वेग बदलला,
सोबत बदलली दिशा जरी,

वलये येती कमी अन जास्त कधी
तीच दिशा अन तोच वेग ठेवण्याचा लढा.

लाटांशी झुन्झताना
नवे किनारे शोधणार

नव्या किनाऱ्यांवर
नव्या स्वप्नांचे, नवे आयुष्य जगणार. 


...पिनल चौधरी

Wednesday, September 15, 2010

माझे बाबा

 “त्या दिवशी कुणास ठाऊक पण स्वतःचेच छायाचित्र(फोटो) बघत बसलेली आणि मग स्वतःच्याच शोधात रमलेली”
माझा बालपणीचा एक फोटो...मी निरीक्षण करत होती एवढी लहान होती मी...
एवढी मोठी झाली पण कधी? आणि कदाचित त्या दिवशी मला अस समजल की म्हणूनच फोटो काढायचे असतात.मग अपली सारखी विचारात पडायची, आत्ता पर्यंतच्या सर्व दिवसात काय काय बदल घडले?मी १ वर्षाची होती आणि आत्ता मी ... वर्षांची झाली(मुलगी आहे न वय नाही सांगणार) ते सोडा,मग मी लहान असताना केलेल्या चुका त्यासाठी आईचा मिळालेला मार, धपाटे, बाबांनी रागावलेले दिवस सर्व आठवत, पण खर सांगू का मला न बाबांनी कधी रागावलेच नाही खरच त्यात आश्चर्य आहे पण मला आठवत नाही कि बाबा मला रागावलेले, मला खूप बोलेले. त्यांची रागावण्याची भाषाच निराळी होती कि त्यांची कधी भीतीच वाटली नाही आणि मग मी चूक केली जरीना की स्वतःच जाऊन सांगायची आणि बाबा समजावून सांगत त्यामुळे नंतर ती चूक नाही घडायची, त्यात त्यांच प्रेम, काळजी, लाड असायचे. त्यांच एक तत्व आहे मुलांना धाक दाखऊ नका त्यांना समजून घ्या आणि ते मला आत्ता पटत आहे. बाबांच्या ह्या वागण्यावरून आई सारखी बोलायची अजूनही नेहमी बोलत असते तुमच्या लाडान पोरगी बिघडली आहे, पण बाबांना त्याच देखील हसू येत, कारण त्यांच्या शिवाय मला खरच कोणी समजू नाही शकत. मी आधी पासूनच बाबांच्या जवळची, बाबांची लाडकी, आत्ता परिस्थिती बदली नाही आणि माझ पण तेच बाबाच मला नेहमी जवळचे वाटतात म्हणजे अगदी मैत्रिणी पेक्षा पण आणि आई पेक्षाही. मला काही करावस, बोलावसं, मागावस वाटला न तर आपोआपच बाबा आठवतात.
पण भीती तीच जी प्रत्येक मुलीला वाटते ती कि नंतर मी लग्न करून दुसऱ्या घरात जाईल तेव्हा, अस वाटल आणि आपोआप बाबा आठवले तर तेव्हा मी काय करेल. माझा सोबत बाबा नसतील तेव्हा. ते सोबत असतीलपण परंतु परिस्थिती वेगळी असेल, मग तेव्हा मी कमजोर बनेल. तर नाही कठीण परीस्थितीत मला ठामपणे उभ राहणं शिकवल आहे माझा बाबांनी. जसे वडाच झाड उभा राहतना अगदी तसच, वडाचच झाड का, तर माझा घरा जवळ वडाच झाड आहे आणि त्याला बघितल तर मला माझे बाबा आठवतात अगदी त्याच्या सारखेच आहेत ते. माझ्या बाबांची सवय झाली आहे मला आणि का नाही झालीच आहे पण बाबांनी मला हतबल नाही केला कधी. ते नेहमी माझी ताकत बनले आहेत, त्यांनी प्रत्येक परिस्थितीत लढण शिकवल आहे आणि ते ही कुढत नाही तर अगदी आनंदानं. तर ह्या परिस्थितीत मी अशी खचणार नाही मी बाबांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःच्या नव्या आयुष्याची वाटचाल करणार आहे आणि तेव्हाच मग त्यांच्या शिकवलेल्या गोष्टीची खरी परीक्षा असेल आणि मला बाबांनी दिलेल्या आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास आहे आणि मी जिंकणार आहे.


...पिनल चौधरी


Tuesday, September 14, 2010

आयुष्याची व्याख्या करते आहे
ते करूनही समजून घेण कठीण आहे. 


...पिनल चौधरी

Monday, September 13, 2010

चारोळी

का कुणास ठाऊक
पण मन वेढ्यासारखा वागत आहे
आणि उगीचच
अपेक्षांचा ओझ वाहत आहे.
  ..पिनल चौधरी

आयुष्यगीत.....






सोनसकाळी भूपाळी गाता
जीवनाची मैफिल रंगवता
सुखाचे श्रोते मोजता
आयुष्यगीत गावे.....

असावा किनारा स्वतःच्याच मुल्यांचा
वावरणे तेथे मनास वाटेल तेव्हा
समुद्राच्या खोलात भविष्य-शिंपले उघडावे
आयुष्यगीत गावे....

त्याच किनाऱ्याने...मुठीत धरावे संकट-दुखांना
मग निवांत मनाने
भविष्य-शिम्प्लांतले मोती पांघरावे
आयुष्यगीत गावे....

नको कशाची बंधने, फक्त व्हावे मुक्त वावरणे
पांघरलेल्या मोत्यांची चमकच
उजळवेल गुढ-भविष्याचे..
त्याच भविष्याला मग आयुष्यगीत म्हणावे.

......पिनल चौधरी

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...