Monday, January 10, 2011

कविता!!!

कविता..
कश्या त्या मनातल
ओकून टाकतात
सांडून टाकतात
साऱ्या भावना
.....
कविता
साऱ्यांच्याच नसतात
वाचण्याजोग्या
साऱ्यांना नाही
येत मांडता
.......
कविता
बस त्या जमतात
मनात काही नसतांना
आणि कधी जमतच नाही
मनात खूप काही असतांना
.....
कविता
कधी बोलतात
पण कधी खूप सांगून
देखील शांत
वाळवंटा सारख्या
......
कविता
त्या माझ्या
सोबती सख्या
त्या देखील
माझ्या सवे जगतात
......  


....पिनल चौधरी!!

Wednesday, January 5, 2011

क्षण...

क्षणाचे आपण असतो गुलाम...
क्षणा-क्षणाला करतो चाल...
त्या क्षणाला गाठायची हाव..
पण क्षणाचा नेहमीच पुढाकार....  

Monday, January 3, 2011

माझे जगणे

स्वतःलाच नेहमी परीक्षन्ते...
स्वतःवरूनच जग ओळखते..
असे हे नेहमीचेच...
ह्यालाच मी माझे जगणे समजते....

माझ्या चुका मलाच त्रास देतात...
कोणाचे बोलणे मला खचवते...
न-चुकता मला ध्येय गाठायचं आहे..
आणि आयुष्य जगायचे आहे....

हाच माझ्या जगण्याचा उद्देश..
परिपूर्ण आयुष्याचा वेध...
नसावे जगणे चौकटीचे..
हवे ते कसे आकाशाप्रमाणे मोकळे...

ध्येयप्रेरित मी.... बस 
साथ हवी आपल्यांची...
दोन शब्द प्रेमाची....
शिदोरी सोबत आत्मविश्वासाची...

.....पिनल चौधरी!!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...