Thursday, March 24, 2011

कविता... माझ्या नवऱ्यासाठी लिहिलेली, त्याच्या जन्मदिवशी....


आठवले ते दिवस आठवातले की... स्वतःशीच होते हितगुज,
मग खूप आनंद, आणि मग हसण हळूच लाजून!!!

तुझ्या अस्तित्वाचे हे मूल्य पुरे,  मज जगावया आयुष्य...
सोबत तुझ्या साथीची, द्यायला त्यास अर्थ!!

तुझ्या असण्याचे चांदणे  शिंपले गेले कधीच माझ्या जगण्यावर
मग नको मला शोध स्वतःचा, जर ओळख असे तुझ्यावर....

ह्या आपल्या नात्यात..
उदारतेच प्रेम अतूट वसे ...
आपल्या दोघांच्या डावाला तेज सूर्याचे ...
आयुष्यातील वळणे चंद्राच्या शीतल छायेत कोरू देत..
अन त्या वळणावर मिळू देत चिरकाल सुख देव-आशीर्वादात...
अतित्वातले आदर्शवादी आपले जगणे मग जमवूयात ...

मिळू देत तुला भरभरून माया,आपुलकी,  
बरसु देत यशो,धन वृष्टी,
असू देत छाया देवाची संरक्षणरूपी.
जगू दे मज....
अन जगणे माझे लपले तुझ्या खळखळून हसण्यावर ....  
नकोत कधी काळे आभाळ वेदनांचे तुझ्यावर
जरी केली गर्दी त्यांनी करेल मी मात त्यांच्यावर...
जन्म माझा तुला जपावयात...
देव करो होवो त्याचे सार्थक...

हा दिवस खरंच माझ्या साठी अनमोल  
कारण तुझ्या जन्माने देखील मला मोल..
अजूनही मी साद घालते आपल्या भेटीच्या त्या क्षणाला
त्यानेच भरभरून सुख आले माझ्या पदराला...

जग अस्तिवात राहून
आपल्या स्वछंदी आकाशी-महलात
अन त्या ताऱ्यांना आणून
चमकऊन टाक तुझ्या कर्तृत्वास!!!!

~~~ सौ पिनल भूषण चौधरी!!!

Saturday, March 12, 2011

रात्र....

चंदनी रात्र..


मला नेहमीच भावली...
साथ तिची माल..
त्या सूर्याच्या अगमनास्तोवर...
माझे हितगुज तिच्या सवे...
आणि ती अशी चूप चाप.... भयाण रात्र...
पण ती कोणाला काहीच न सांगणारी...
परत येणारी कालचे हितगुज विसरलेली..
नवी कोरी रात्र...
त्या अंधारात का कुणास ठाऊक तिला मी दिसते का??
आमची ओळख...
तिला-माझी, माझ्या आवाजाने...
अन मला-तिची तिच्या शांत, काळोख अस्तित्वाने...
ती दुवा दोन दिवसांचा..          
अन माझ्या रोजच्या परीक्षेचा....
रात्र...

--पिनल!!!



असे हताश मज न व्हायचे
न सोडायचा धीर मज
बस आत्मविश्वास जवळ आहे
त्या चुकांना मिटवाया

Friday, March 4, 2011

मी सिकंदर.....

झटले होते मी खरंच...
ह्या सुखासाठी लढले होते मी खरंच..
पण आशा नव्हती केली कधी फळाची..
बस आईच्या वाक्यावर श्रद्धा होती
एक दिवस तुझा ही येईल....
बस कष्ट फक्त मनापासून कर...
ह्या दिवसांमध्ये खरी जीवनशैली शिकली...
अत्त कशी विश्वासाने स्वार होऊन..
जग जिंकणारी मी सिकंदर बनली...



~~पिनल चौधरी!!!

Wednesday, March 2, 2011

हेच का आयुष्य ????


फुलाच्या कळीला....
हो फुलाच्या कळीला उगीच तोडले...
काय बर मिळाले त्या क्रूर माणसला तोडून?
ती नाजूक सुंदर काळी....
स्वप्न सजवून बसली होती त्या लहानश्या फांदीच्या जगात.
हो तीच स्वप्न...... जी प्रत्येक कळी बघते.....
आपले रूप ह्याहून सुंदर होणार.....
कळीचे आपण सुरेख से फुल होणार....
हो तेच फुल...जे जगात सर्वात देखणं म्हणून ओळखलं जात...
त्याचा उपयोग देवला प्रसन्न करण्या पासून...
तर अंत यात्रेत प्रेतावर टाकण्या पर्यंत होतो.
तिने स्वप्न बघितली काय बरं चुकल तीच?
कोनालाच हक्क दिला नाही तिने, तिच्या आयुष्याचा नाश करायचा.
...........
तिची त्या फुलपाखरा सोबत मैत्री होती....
त्यांच्या नात्यात एक वेगळीच घट्ट अशी वीन होती....
कोणी समजू न-शकण्या जोगी.....
आणि खरंच कोणीच ती समजू नाही शकल...
मुसू-मुसू रडल ते फुलपाखरू बस!!!!
ते ही काय करणार ना बिच्चार?
लहानस फुलपाखरू ते...
ह्या मोठ्या जगात..
कोण ऐकणार त्याच्या???

Tuesday, March 1, 2011

असच-----!

आभाळात पहिले तर हेवा वाटतो....त्या आभाळाचा
पण मला हेवा वाटतो त्या अभाळाप्रमाणे जगणाऱ्या लोकांचा...
त्यांच्या विचारांचा...
त्यांच्या कर्तुत्वाचा....
खरंच ते असतात आभाळा प्रमाणे...
मोठ्ठे...
विस्तारीत....
डोक्यावरती छ्प्परासारखे....
त्यांच्या ध्येयांना उसन घ्यावं अस वाटत...
आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याच मनगटाला आपला हात लावावा
त्यांच्या मनगटात एवढ बळ असत की नुसता हात लावताच एक वेगळी स्फूर्ती मिळेते....
अन मग त्या स्फुर्तीला कसे जपून ठेवावे आणि वापरावे अगदी मोलाने.... त्यांच्या सारखे!!!


~~पिनल चौधरी!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...