Saturday, April 30, 2011

फसवे हे नशिबाचे डाव


मृगजळा सारखेच त्यांचे घाव

जगणारयाला मारून

हिस्कावतो कर्तुत्वाचे गाव

 
~~pinall!!

Friday, April 22, 2011

माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी!!!

तो मला बिलगलेला
अन मी त्याला.
स्पर्श असा शहारा आणणारा
त्या स्पर्शात न्हाऊन घेतलं स्वतःला.

त्याच्या त्या चुंबनाची
पार वेडी झालेली मी
बस त्या गालाच्याच
प्रेमात पडलेली मी.

त्याची नजर मला मला सांगणारी
किती सुंदर तु जशी कोणी नाही
तो तर मला प्रियच पण
आत्ता स्वतःच्याही प्रेमात पडलेली मी.

तो तो आणि बस्स तोच
ज्याच्या असण्याने माझे जगणे
ज्याच्या जगण्याने माझे
अस्तित्व बनने.....

~~~पिनल!!! 

Sunday, April 17, 2011

प्रश्न????

बस एक सर्व सामान्यांसारखी
माझी जीवन गाथा?
मग काय अर्थ त्या जगण्याला?
काही तरी कर्तुत्व करून दाखवावे,
चार लोकांनी आपल्याला आठवावे,
लोकांनी आठवण करावी म्हणून
चांगली काम करायची?
की स्वतःच्या मनाल पटतात म्हणून?
बरीच प्रश्न माझी जगण्याविषयी
आणि एक दिवस ह्या प्रश्नांन मधूनच
घडवायचे मज माझे सुंदर जगणे.
त्या साठी लाभली मला
किल्ली आत्मविश्वासाची
आणि त्या किल्लीने उघढेल मी
ह्याच प्रश्नांच्या तिजोरीस!!!! 

~~पिनल!!!!

Tuesday, April 12, 2011

माझ्या साठी :)

माझ्या मैत्रिणीने माझ्या साठी लिहिलेली ही छानशी चारोळी 
छोटी आहे पण त्यात खूप काही दडल आहे. 


"मैत्री तुझी नि माझी
जणु माझ्या नशिबाचा भाग होति
तळहातावरच्या रेषांखाली दडवलेल्या स्वप्नांचि
ती जणु सुंदर सुरुवात होती"

....ruchira

स्वप्नाची दुनिया!


स्वप्नाची दुनिया
ह्या वाक्यावर जगण्याचा वाटोळा
शोध त्या स्वप्नांचा जीव घेतो माणसांचा
मर-मर मरून स्वप्नांचा शोध
मग शोधा नंतर धरून बसण्याची ओढ....
ह्या ओढा-ओढीत बस गमवतो तोल
आणि हताश पश्च्याताप
ह्यांनाच म्हणावे लागते मग
जीवनाचे मोल!!!!

 ~~~पिनल!!!

नशिबाचे खेळ!!!


नशिबाचे खेळ की
माणसांच्या खेळांचे नशिब
कोणाला मिळते नशिबाने
तर कोणी स्वतःच बनवत नशिब
कसे ठरवावे नाशिब
हातांच्या रेषा? की
कपाळावरच्या आठी?
ह्या नशिबावर आपण सारे मोहित
नशिबाच्या नशिबावर भारी श्रद्धा आमची
नशिब नशिब म्हणवता म्हणवता
खापर फोडायला सापडतो खर तर गडी!

~~~पिनल!!!                        माझे.......

शांत बसले...... डोळे लाऊन मनात डोकावले....... काय काय सापडल ?? धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना ...