Thursday, August 4, 2011

जगणे?????


जसा जन्म झाला त्या दिवसा पासून मी जगण्याच्या तऱ्हा शिकते आहे.
खरंच पण जी तऱ्हा शिकते ती तऱ्हा लगेच बजावण्याची संधी मिळतच नाही,
मग पुन्हा नवीन तऱ्हा शिकण्या शिकण्यात मागची तऱ्हा विसरायला होते.
मग पुन्हा तोच अभ्यास तेच शिकन. नको!!!
मला माझ्या स्वतःच्या नियमाने जगायचं आहे...
मग त्या नियमांना देखील कशाचे नियम नको तत्व नको..
बस जगू द्या आणि जागल्या नंतर मग शिकू द्या.
चुकेल मी, मला मान्य आहे. पण मग नवीन शिकण्याचा आनंद वेगळाच असले.
आणि ह्या शिकण्याला मला बजवाव नाही लागणार.
ना त्यला लक्षात ठेवावं लागणार....
ते कस आपोआपच रक्तात भिनणार आणि माझे अस्तित्व घडवणार.
जन्म ह्या शब्दाने मी पार बधीर झाली आहे.
जगण्या जगण्या मध्ये खरंच का मी जगते आहे????

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...