Sunday, October 23, 2011

आपल नातं....


रुजायला आपल्या नात्याला
प्रेमाचे पाणी नव्हतेच कधी
बोचणाऱ्या त्या काट्यांना
छाटले कोणी नव्हतेच कधी

उत्तरांच काय घेऊन बसलास
प्रश्नाचा कल्लोळ थांबव जरा
त्याने श्वास जडवले रे
त्यांचे ओझे सोडव जरा

पावलोपावली तुझेच ठसे
टोचता आहेत माझ्या चालण्याला
ओल्या क्षणांची ती माती
फसवते आहे माझ्या जगण्याला

बोलण्याच्या पलीकडले आपले नाते
आता बोलण्याच्या गोंगाटाचे,
कोणा न जमले कुणाच्या
मनातले गोंगाट झोपवणे

त्या हातांचे कधीच सुटणे
आणि फुलपाखरा सारखे रंग देणे
मग त्या रंगांचे नवीन
चित्रातले आयुष्य रंगवणे

 ~~~`Pinal!!!!

Monday, October 10, 2011

चारोळी


 तुझे काय सर्वांनीच घायाळ केले
 माझे असे काहीच न राहिले,
 स्वप्न ती फक्त माझी उरली होती
 त्यांना देखील तू विकत घेतली

चारोळी


स्वपनांच काय घेऊन बसलास
ते आज रात्री एक तर उद्या
दुसरे रूप घेतात, म्हणून तू मला
स्वप्नांत नको भेटत जाऊस

Sunday, October 9, 2011

सुख-दुःख



अश्रुनी मी लाचार नाही
न मी दुःखाची ओझी वाहणारी
माझ्यात एक ठिणगी
सुखाला शोधायला वणवा पेटवणारी

दुःख हे जीवनाचे दुसरे नाव
त्याच्या शिवाय न त्याला भाव
पण दुःखाच्या पाठी नेहमी
उभे आहे सुखाचे नाव

सुख सुख म्हणजे तरी काय?
आनंद हसू कि अजून दुसरे काय(?)
सुख म्हणजे तर चेहऱ्यावरील
समाधानाची छबी अन बाकी काय

~~पिनल!!!!!

Tuesday, October 4, 2011

कवी!!!

अजकल विचारांची नुसतीच
भांडणं सुरु आहेत...
आनंदने कागदावर मांडणे ठरवले
कि दुःख आपोआपच पुडे येते आहे
पेन हाती घेतले...लिहयला टेकवले
कि नुसते शाईचे थेंब पडत आहेत
कोणाला आधी मांडव(?)
ह्यातच वाद आहेत
पण मग इथेच तर खरी कला आहे
विचार प्रत्येकाच्याच मनात, डोक्यात आहेत
पण मांडणाऱ्यालाच तर
कवीची उपमा आहे......

~~पिनल!!!

Sunday, October 2, 2011

चारोळी



आत्ता गेला आहेना
मग मागे नको वळू
तुझ्या शिवाय जगण्याची
उमेद नको विझवूस  

~~पिनल!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...