Saturday, June 8, 2013

जिंकण

उन पावसाच्या ह्या खेळात
खरंच कोणी जिंकत नसतरे
बस त्यातला एक एकला
एक एक संधी देत असतो...

मात्र तू नेहमीच आपल्यात
स्पर्धा करत गेलास....
पुढे राहण्यासाठी
मला मागेच सोडत गेलास...

आत्ता मला बोलाऊ नकोस.....
तुझ्या पर्यंतच अंतर
खूप वाढलंय......
ते मला गाठण कठीण आहे

कठीण नाही तर अशक्यच
कारण मला नाही जमणार
तुझ्या सारख वागणं
सर्व काही मागे ठेऊन पुढे पुढे जान......~~पिनल चौधरी!!!! 

माझे.......

शांत बसले...... डोळे लाऊन मनात डोकावले....... काय काय सापडल ?? धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना ...