Wednesday, May 24, 2017

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने
पण प्रत्येक पावलावर आशा आहे

पाऊलो पाउली खचते आहे
पडते आहे उठते आहे

कुठला गाव माझा दूरवर
दिसेना अजून डोळ्यांना

चालते, चालते आहे सोबत
सगळी कर्तव्ये घेऊन

एक वाट माझी येईल
कुठे तरी माझी विसाव्याची झोपडी मिळेल

हि एकच शिदोरी हाती आहे
आणि तुझी साथ हवी आहे.

--पिनल चौधरी! 

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...