Thursday, September 23, 2010

promise

Give me promise…….
That u never break any promise that u are giving and you’ll…
Because these promises becoming my breath n my breath will becomes your life.

वाट....

कोवळे दिस सरुनी जाती
नकळत त्याच्या अन माझ्या
परतुनी फिरतील ते कधी आता?

ऋतू ते सारेच सुगंधी वाटे,
त्याच्या प्रीतीच्या पावसात चिंब भिजे
परतुनी तो वारा कधी बहरेल?

गेला दूर देशी वेड लाऊनी
वेड देखील हवे वाटे
परतुनी येईल कधी माझ्या देशी?

वाट बघते न-मिटता डोळे
मिटताच क्षणी पानावते
पाणावलेले डोळे कोरडे होण्याआधी यावे!!!!!!

...पिनल चौधरी

Sunday, September 19, 2010

आयुष्य...... संकट सुटेना

आकाशात आहेत असंख्य तारे,
तशीच स्वप्न डोळ्यात असंख्य.

जिद्द उराशी बाळगून,
स्वप्नांसाठी लढणार आयुष्य.

संकटांच्या ढगात देखील
चंद्रासारखी लपणार नाही.

माझ्या नावेने तिचा वेग बदलला,
सोबत बदलली दिशा जरी,

वलये येती कमी अन जास्त कधी
तीच दिशा अन तोच वेग ठेवण्याचा लढा.

लाटांशी झुन्झताना
नवे किनारे शोधणार

नव्या किनाऱ्यांवर
नव्या स्वप्नांचे, नवे आयुष्य जगणार. 


...पिनल चौधरी

Wednesday, September 15, 2010

माझे बाबा

 “त्या दिवशी कुणास ठाऊक पण स्वतःचेच छायाचित्र(फोटो) बघत बसलेली आणि मग स्वतःच्याच शोधात रमलेली”
माझा बालपणीचा एक फोटो...मी निरीक्षण करत होती एवढी लहान होती मी...
एवढी मोठी झाली पण कधी? आणि कदाचित त्या दिवशी मला अस समजल की म्हणूनच फोटो काढायचे असतात.मग अपली सारखी विचारात पडायची, आत्ता पर्यंतच्या सर्व दिवसात काय काय बदल घडले?मी १ वर्षाची होती आणि आत्ता मी ... वर्षांची झाली(मुलगी आहे न वय नाही सांगणार) ते सोडा,मग मी लहान असताना केलेल्या चुका त्यासाठी आईचा मिळालेला मार, धपाटे, बाबांनी रागावलेले दिवस सर्व आठवत, पण खर सांगू का मला न बाबांनी कधी रागावलेच नाही खरच त्यात आश्चर्य आहे पण मला आठवत नाही कि बाबा मला रागावलेले, मला खूप बोलेले. त्यांची रागावण्याची भाषाच निराळी होती कि त्यांची कधी भीतीच वाटली नाही आणि मग मी चूक केली जरीना की स्वतःच जाऊन सांगायची आणि बाबा समजावून सांगत त्यामुळे नंतर ती चूक नाही घडायची, त्यात त्यांच प्रेम, काळजी, लाड असायचे. त्यांच एक तत्व आहे मुलांना धाक दाखऊ नका त्यांना समजून घ्या आणि ते मला आत्ता पटत आहे. बाबांच्या ह्या वागण्यावरून आई सारखी बोलायची अजूनही नेहमी बोलत असते तुमच्या लाडान पोरगी बिघडली आहे, पण बाबांना त्याच देखील हसू येत, कारण त्यांच्या शिवाय मला खरच कोणी समजू नाही शकत. मी आधी पासूनच बाबांच्या जवळची, बाबांची लाडकी, आत्ता परिस्थिती बदली नाही आणि माझ पण तेच बाबाच मला नेहमी जवळचे वाटतात म्हणजे अगदी मैत्रिणी पेक्षा पण आणि आई पेक्षाही. मला काही करावस, बोलावसं, मागावस वाटला न तर आपोआपच बाबा आठवतात.
पण भीती तीच जी प्रत्येक मुलीला वाटते ती कि नंतर मी लग्न करून दुसऱ्या घरात जाईल तेव्हा, अस वाटल आणि आपोआप बाबा आठवले तर तेव्हा मी काय करेल. माझा सोबत बाबा नसतील तेव्हा. ते सोबत असतीलपण परंतु परिस्थिती वेगळी असेल, मग तेव्हा मी कमजोर बनेल. तर नाही कठीण परीस्थितीत मला ठामपणे उभ राहणं शिकवल आहे माझा बाबांनी. जसे वडाच झाड उभा राहतना अगदी तसच, वडाचच झाड का, तर माझा घरा जवळ वडाच झाड आहे आणि त्याला बघितल तर मला माझे बाबा आठवतात अगदी त्याच्या सारखेच आहेत ते. माझ्या बाबांची सवय झाली आहे मला आणि का नाही झालीच आहे पण बाबांनी मला हतबल नाही केला कधी. ते नेहमी माझी ताकत बनले आहेत, त्यांनी प्रत्येक परिस्थितीत लढण शिकवल आहे आणि ते ही कुढत नाही तर अगदी आनंदानं. तर ह्या परिस्थितीत मी अशी खचणार नाही मी बाबांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःच्या नव्या आयुष्याची वाटचाल करणार आहे आणि तेव्हाच मग त्यांच्या शिकवलेल्या गोष्टीची खरी परीक्षा असेल आणि मला बाबांनी दिलेल्या आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास आहे आणि मी जिंकणार आहे.


...पिनल चौधरी


Tuesday, September 14, 2010

आयुष्याची व्याख्या करते आहे
ते करूनही समजून घेण कठीण आहे. 


...पिनल चौधरी

Monday, September 13, 2010

चारोळी

का कुणास ठाऊक
पण मन वेढ्यासारखा वागत आहे
आणि उगीचच
अपेक्षांचा ओझ वाहत आहे.
  ..पिनल चौधरी

आयुष्यगीत.....






सोनसकाळी भूपाळी गाता
जीवनाची मैफिल रंगवता
सुखाचे श्रोते मोजता
आयुष्यगीत गावे.....

असावा किनारा स्वतःच्याच मुल्यांचा
वावरणे तेथे मनास वाटेल तेव्हा
समुद्राच्या खोलात भविष्य-शिंपले उघडावे
आयुष्यगीत गावे....

त्याच किनाऱ्याने...मुठीत धरावे संकट-दुखांना
मग निवांत मनाने
भविष्य-शिम्प्लांतले मोती पांघरावे
आयुष्यगीत गावे....

नको कशाची बंधने, फक्त व्हावे मुक्त वावरणे
पांघरलेल्या मोत्यांची चमकच
उजळवेल गुढ-भविष्याचे..
त्याच भविष्याला मग आयुष्यगीत म्हणावे.

......पिनल चौधरी

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...