Sunday, April 8, 2018

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते.. 
मनालाही माझ्या सुखावले होते..
ते क्षण तुझे नि माझे... 
मला जगायचे होते..

का कुणास ठाऊक
आज ती सकाळ नाही.. 
तुझ्या भेटण्याची ओढ नाही..
तुझ्या दिसण्याचे वेध नाही. 

तुझ्या साठी माझा जीव.. 
क्षणोक्षणी झुरायचा... 
तुझ्याच मागे धावायचा..
जिथे तिथे तुला शोधायचा... 

का असा तू अचानक..
दुरावला.. 
माझ्याशी रुसला.. 
कधी भेटशील तसाच पुन्हा 

जसा तू माझा होतास.....!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...