Monday, February 28, 2011

तू आणि मी भेटण.


तू आणि मी भेटण..

म्हणजे....

जसे शब्दाला असलेला अर्थ
जसे वाक्याला लाभलेला अलंकारिक स्पर्श
कवितेला आलेला गंभीर मर्म
आणि ह्या जीवनी वाड.मयातले  आपण दोघ तज्ञ.

~~~पिनल चौधरी!!

Saturday, February 26, 2011

माझे चुकते का??


खरंच आज वास्तवात आणलस
उगीच स्वप्न-देशात वावरत होती

कसे जगणे कठीण असते?
ह्याची ओळख करून दिली.

आपण वेगळे आहोत ह्या एका वाक्याने
मला उमेद मिळत होती.

पण खरंच माझ्यात अस
वेगळ तुला जाणवतच नसाव.

सूर गवसला होता जगण्याचा
का कुणास ठाऊक पण रागाची पट्टीच चुकली.

हरणारी मी कधीच नव्हती
अन ह्या पुढे ही राहणार नाही

बस स्वतःचे निरीक्षण.. अन
मिळवीन सुरातले गायन!!!!!


~~पिनल चौधरी!!!

Tuesday, February 22, 2011

हवे मला


जुने स्वप्न परत जगायचे
आणि त्यासाठी लढायचे

डोळ्यातले भाव पुन्हा ओतायचे
आणि ते कोणीतरी भरायचे

तेच भांबावलेले दिवस हवे
अन तेच अर्धवट शहाणपण

हळवे मायाळू प्रेम पुन्हा हवे
अन मायेच्या स्पर्शाचे बोल

त्याच काटेरी वाटांवर चालुदेत
आणि बुडू दे त्या भयाण सागरी लाटात

नको हे न-पेलणारे ओझे
नको उगीच आशेचे घरोंदे

बस ह्या आकाशाचा हेवा
अन हेवा ह्या वादळाचा....

~~~पिनल!! 

Monday, February 21, 2011

अपूर्ण


का असे होते आहे
काही सुचता सुचता
अचानक थांबते आहे...खरंच
माझ मन माझ्या पाशी नाहीं आहे

पहिला भाग जमतो
पण दुसऱ्या भागाला अडते
खरंच तुझ्या शिवाय
मी अपूर्णच....

बघ ना अस..
किती दिवस चालायचं...
अपूर्ण अपूर्ण आयुष्य...
कस बर जगायचं....

ते पूर्ण होणार
तू येणार..
ह्या आशेवर जगते आहे
आणि मरते देखील...


~पिनल....


तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...