Wednesday, July 13, 2011

भावना!!!

भावनांच्या ह्या गर्दीत कुठे

हरवली कदाचित मी...

अन भावनांना आवर घालता घालता...

बेभान झाली मी..



इतरांसाठी.... ह्या भावनांना

लपवणे आणि बांध घालणे,

आवरणे त्यांना....

अन मग वाटते एक दिवस

ह्या भावनांनाच बांधून

माडीवर टाकावे..



नाही कोणाचा आरोप

नाही कोणाची तक्रार मझवर

पण माझ्याच तत्वांची

सीमारेषा मला येते आड...

ह्या तत्वांचे मग पारडे जड होते

अन मी पुन्हा त्या

भावनांच्या गठीत कुठेतरी

गुरफटून जाते....


~~पिनल!!!

Monday, July 11, 2011

ओघळनारया त्या आठवणी!!!!

ओघळनारया त्या आठवणी

मनाला स्पर्शून.... दूर गेलेल्या,
पाण्यासारख्याच त्या...
सावरतांना, ओंजळीत थेंबभर मावणाऱ्या!

थेंब थेंब आठवणी
सावरत....बावरणारी मी
जिद्द, पाण्याला मुठीत घेऊन
त्याचे तळे बनवण्याची...

अशीच मग
मी निवांत....
त्या तळ्याकाठी
हरवलेली....

ह्या जीवनाच्या पसाऱ्यातून...
दूर दूर गेलेली...
अन क्षणभर स्वतःत
हरवण्याचा आनंद घेणारी...


~~पिनल!!!

Friday, June 17, 2011

बाजार भाव...




बाजार भाव आलाच नसता
माझ्या स्वप्नांना कदाचित,
कारण ती इतकी अनमोल होती
कि बाजारात विकलीच गेली नसती

मी त्यांचा बाजार मांडावा
अस नाहीच मुळी....
पण त्यांना जपून पण
मला काय लागणार होता हाती?
पण त्यांना विकाव
कारण मग माझ्याच
घरात त्यांची अडगळ न बनावी.

विकत घेणारा त्याला...
त्याच्या घरात त्यांना
तो सुरेख सजवून ठेवेल
त्या निमिताने त्यांची
जपन तरी करेल.
का नाही त्याने त्या साठी
चार पैसे जे खर्च केले असतील!

मग मी आपली
त्याच्या कडे गुपचूप जाऊन
स्वप्नाची खुशाली बघून
मनात बस समाधानी बनेल(?)

~~~पिनल!!

Sunday, June 12, 2011

पाऊस ...... कि-उत(?)



गवताची पाती!!!

अन नुकतीच फुललेली कळी!!!

प्रतीक्षेत सारे..... त्या गार पावसाच्या थेंबाच्या.....


 

ती दुपार पार उन्हात न्ह्यालेली!!

चटके त्या रस्त्याने सोसलेली!!

यांनाही लाभणार सुख त्या थेंबांनी.....



संध्याकाळ ती तापलेली... त्यात

बागांना देखील शापाची भीती.....

बस!!! एका थेंबाने न्हाऊन उठणार हे ही....



पावसाची त्यात मेहरबानी....

धो धो बरसण्याची!!

सर्वांना चिंब भिजवून....

तृप्त आत्म्यांचा आशीर्वाद घेण्याची.....



पावसाच्या थेंबा थेंबात

जीवन शोधणारे....

सारे!! सुखाने न्हाऊन निघाले!!!



मानवी मनाची भारीच काळजी पावसाला!!

त्यांच्या भरण्याची सोय....

पावसाने करून ठेवली...!!!



पण!!!

मानवी मन ते....

मन भरत नाही तोवरच...

पावसाला शिव्या द्यायला सज्ज!!



~~~पिनल----

Thursday, June 9, 2011

तेच स्वप्न!!!

तेच स्वप्न....


जे प्रत्येक मुलगी बघते....

आपल्या प्रियकराचे

...................

ते हवे हवे स्पर्श,

त्याच्या प्रत्येक चुंबनाचे शहारे,

त्याच्या प्रत्येक शब्दांआड दडलेले प्रेम,

त्याच्या सवे जगण्याचे व्रत,

त्याच्या साठी जीवन वाहून द्याची इच्छा,

त्याच्या नावाची मेहंदी,

त्याच्या हाताने घातलेले मंगळसूत्र,

आणि त्याच्या नावाचा शृंगार,

ह्या शिवाय काय हवे एका भारतीय मुलीस(?)

अन मलाही तेच हवे....

न कुठल्या अपेक्षा, न कुठल्या अटी

बस प्रेम प्रेम आणि प्रेम..

जे तुझ्या कडून मिळण्याची इच्छा......

तू करशील न पूर्ण?

...........

ह्या एका उत्तरासाठी

माझे जगणे अन

मरणे देखील!!!!



पिनल!!!

Tuesday, May 24, 2011

आयुष्याच्या चौकटीत


आयुष्याच्या चौकटीत माझ्या,
उंबरठ्यावरील ती सुखांची दुनिया
खुणावते काही(?) अन मी
तिच्या रंगानी सजवते चौकट हि.



जिंकायची आस!!!


पापण्यांन आड अश्रू लपवले
अन दुखांचे डोंगरहि

खोटे हसून कधीच पडले

कुढणेहि सोडलेच आहे मी

ह्या धड्पडीत

नशिबाला घेरून ठेवले

मी माझ्या कर्तुत्वाने

कर्तुत्वाला अन प्रेमाला

दोर बाधून जग

जिंकायची आस आहे...



~~पिनल!!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...