Monday, October 10, 2011

चारोळी


स्वपनांच काय घेऊन बसलास
ते आज रात्री एक तर उद्या
दुसरे रूप घेतात, म्हणून तू मला
स्वप्नांत नको भेटत जाऊस

Sunday, October 9, 2011

सुख-दुःख



अश्रुनी मी लाचार नाही
न मी दुःखाची ओझी वाहणारी
माझ्यात एक ठिणगी
सुखाला शोधायला वणवा पेटवणारी

दुःख हे जीवनाचे दुसरे नाव
त्याच्या शिवाय न त्याला भाव
पण दुःखाच्या पाठी नेहमी
उभे आहे सुखाचे नाव

सुख सुख म्हणजे तरी काय?
आनंद हसू कि अजून दुसरे काय(?)
सुख म्हणजे तर चेहऱ्यावरील
समाधानाची छबी अन बाकी काय

~~पिनल!!!!!

Tuesday, October 4, 2011

कवी!!!

अजकल विचारांची नुसतीच
भांडणं सुरु आहेत...
आनंदने कागदावर मांडणे ठरवले
कि दुःख आपोआपच पुडे येते आहे
पेन हाती घेतले...लिहयला टेकवले
कि नुसते शाईचे थेंब पडत आहेत
कोणाला आधी मांडव(?)
ह्यातच वाद आहेत
पण मग इथेच तर खरी कला आहे
विचार प्रत्येकाच्याच मनात, डोक्यात आहेत
पण मांडणाऱ्यालाच तर
कवीची उपमा आहे......

~~पिनल!!!

Sunday, October 2, 2011

चारोळी



आत्ता गेला आहेना
मग मागे नको वळू
तुझ्या शिवाय जगण्याची
उमेद नको विझवूस  

~~पिनल!!

Sunday, September 18, 2011

हे असच होणार !!!!


हे असच होणार...
मी तुझ्यावर अपार प्रेम करणार 
तू मात्र मला नेहमी वास्तवात आणणार 

हे असच होणार 
मी नेहमी भाऊक होऊन विचार करणार 
तू मात्र परिस्थितीत  आणून सोडणार 

हे असच होणार 
मी तुला सर्वस्व मानणार  
तू मात्र जगात बर्याच गोष्टी दाखवणार

हे असच होणार
मी आपल्या नात्याला वेगळ रूप देणार 
पण तू मात्र जगात वेगळं काही नाही अस सांगणार 

हे असच होणार 

हे असच होणार 
मी अस होऊ न देण्यास धडपडणार 
पण तू मात्र त्या घडून दाखून देणार 

~~~PINALL~~~

Thursday, August 4, 2011

जगणे?????


जसा जन्म झाला त्या दिवसा पासून मी जगण्याच्या तऱ्हा शिकते आहे.
खरंच पण जी तऱ्हा शिकते ती तऱ्हा लगेच बजावण्याची संधी मिळतच नाही,
मग पुन्हा नवीन तऱ्हा शिकण्या शिकण्यात मागची तऱ्हा विसरायला होते.
मग पुन्हा तोच अभ्यास तेच शिकन. नको!!!
मला माझ्या स्वतःच्या नियमाने जगायचं आहे...
मग त्या नियमांना देखील कशाचे नियम नको तत्व नको..
बस जगू द्या आणि जागल्या नंतर मग शिकू द्या.
चुकेल मी, मला मान्य आहे. पण मग नवीन शिकण्याचा आनंद वेगळाच असले.
आणि ह्या शिकण्याला मला बजवाव नाही लागणार.
ना त्यला लक्षात ठेवावं लागणार....
ते कस आपोआपच रक्तात भिनणार आणि माझे अस्तित्व घडवणार.
जन्म ह्या शब्दाने मी पार बधीर झाली आहे.
जगण्या जगण्या मध्ये खरंच का मी जगते आहे????

Tuesday, July 19, 2011

रात्रीच्या त्या चांदण्या....

रात्रीच्या त्या चांदण्या....
लुकलुकणाऱ्या तुझ्याच आठवणीत,
तुझ्या नसण्याचा तो
घाव भरण्यासाठी...

पंघारल्या होत्या त्यांनाच
मी रडणाऱ्या थंडीत,
त्यांनी हि कापसा सारख जपल रे
क्षणा क्षणाला तुझी म्हणून

आजही तश्याच आहेत त्या
माझी राखण करीत,
रात्रीच्या एकलेपणाला
तुझ्या असण्याचा प्रकाश पसरवीत

पण आत्ता माझ्या सोबतीला तू
अन...त्या मात्र कुठेतरी
एकट्या...........माझ्या सुखाचा....
आनंद साजरा करीत....



~~~पिनल!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...