शांत बसले......
डोळे लाऊन मनात डोकावले.......
काय काय सापडल ??
धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी
जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना कोरायची!
खूप दिवसांपासून न-घालवलेला... साचलेला माझा वेळ....
त्या घड्याळ्यात तिथेच थांबलेला.....
.
स्वतःच्या मालकीचे क्षण....
तसेच बंद पेटीत पडले आहेत....
अल्लड, न-कळणाऱ्या वयातली माझी गुपित ........
जी मी आठवून हसत असे....
ती फार अंधुक होत चाल्ली....
आणि खूप शोधून ही काही गोष्टी सापडत नव्हत्या...
कोणत्या??
...
....
....
माझा छंद...
माझा विरंगुळा...
माझी आवड...
खरंच ह्यातल काहीच सापडलं नाही ...... !!!!
... पिनल
खरंच ज्या गोष्टींपासून आनंद मिळायचा त्याच गोष्टी आपल्यापासून हरवत चालल्या आहेत.
ReplyDeleteमॅडम...
ReplyDeleteमाझं नाव देवेंद्र जाधव...
मी नुकताच या Blog विश्वात प्रवेश केला आहे...
तर कृपया तुम्ही माझे Blog कसे आहेत ते सांगावे...
devendra4.blogspot.in
ही माझी Blog Site आहे...
कृपया Comment Box मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवावी...
तुमच्या प्रतिक्रियेची मी आतुरतेने वाट पाहील