Sunday, October 23, 2011

आपल नातं....


रुजायला आपल्या नात्याला
प्रेमाचे पाणी नव्हतेच कधी
बोचणाऱ्या त्या काट्यांना
छाटले कोणी नव्हतेच कधी

उत्तरांच काय घेऊन बसलास
प्रश्नाचा कल्लोळ थांबव जरा
त्याने श्वास जडवले रे
त्यांचे ओझे सोडव जरा

पावलोपावली तुझेच ठसे
टोचता आहेत माझ्या चालण्याला
ओल्या क्षणांची ती माती
फसवते आहे माझ्या जगण्याला

बोलण्याच्या पलीकडले आपले नाते
आता बोलण्याच्या गोंगाटाचे,
कोणा न जमले कुणाच्या
मनातले गोंगाट झोपवणे

त्या हातांचे कधीच सुटणे
आणि फुलपाखरा सारखे रंग देणे
मग त्या रंगांचे नवीन
चित्रातले आयुष्य रंगवणे

 ~~~`Pinal!!!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...