Wednesday, July 10, 2013

पाऊले.....

चालत राहावे... एकटेच
अनोळखी रस्त्यावर....
कुठे ही जाण्याची घाई नको
नको कोणाचे रस्त्यात भेटणे....

पावलांना कसे स्वछंदी चालू द्यावे
पाण्यात, रेतीत, दगडात,
आणि काट्यात देखील

नेहमीच आपण त्यांना
आपल्या इशाऱ्यावर चालवतो
आज बघू त्याच्या वाटेवर चालून

जमेल का त्यांना
मागे पाऊलखुणा ठेवणं
पुढे जात जात...
मागे नाव कमवणं

दमतील, दुखतील देखील
एका वळणावर....
तिथून पुढे जातील...
कि परततील घरच्या वाटेला?

इथेच तर त्यांची
परीक्षा असेल....
बघू ते पण माझ्या सारखे स्वार्थी होतात का? 

...पिनल!!!! 

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...