Wednesday, May 24, 2017
Tuesday, June 16, 2015
हरवलेली!
का कुणास ठाऊक आज
अचानक मन अगदी
मागच्या काळात गेल.
दूर दूर आत चालत ते
पूर्वीच्या....
परस बागेत गेल.
खूप गोष्टी डोळ्या समोर आल्या.....
एक एक करत.....
सगळ दाखवून गेल्या.
अगदी माझीच पिटुकली पावलं....
घरभर असलेली आणि
माझीच उंबरठा ओलांडलेली पाउलखुण.
सारच बदल आहे, त्या प्रत्येक
क्षणाने वेगळच रूप घेतल आहे.
माझीच मला ओळख
वाटेनाशी झाली आहे....
शोधते आहे....
माझ्यातली “मी”....
माझ्यातली “माझी”.....
माझ्यातली “ती”....
माझ्यातली “???”.....
हरवली आहे का?
-पिनल चौधरी
-पिनल चौधरी
Wednesday, July 10, 2013
सुरवात.....
कशास रे तू असा उदास...
शेवटाच्या विचारात आहे का?
सुरवात तर होऊ देत..
पुढच सार मी सांभाळीन
तुझ्या माझ्या नात्याला
पुन्हा एक संधी दे
त्याचे सोने मी
करेल...
बघ जरा एकदा माघे वळून
चांगल्या क्षणाचे ठसे....
एक नवी उमेद
देऊन जाईल.
बनवूया नव घर
आनंदाने भरलेल
तुझ्या माझ्या स्वप्नात
हरवलेलं.........
------पिनल!!!
पाऊले.....
चालत
राहावे... एकटेच
अनोळखी
रस्त्यावर....
कुठे
ही जाण्याची घाई नको
नको
कोणाचे रस्त्यात भेटणे....
पावलांना
कसे स्वछंदी चालू द्यावे
पाण्यात,
रेतीत, दगडात,
आणि
काट्यात देखील
नेहमीच
आपण त्यांना
आपल्या
इशाऱ्यावर चालवतो
आज
बघू त्याच्या वाटेवर चालून
जमेल
का त्यांना
मागे
पाऊलखुणा ठेवणं
पुढे
जात जात...
मागे
नाव कमवणं
दमतील,
दुखतील देखील
एका
वळणावर....
तिथून
पुढे जातील...
कि
परततील घरच्या वाटेला?
इथेच
तर त्यांची
परीक्षा
असेल....
बघू
ते पण माझ्या सारखे स्वार्थी होतात का?
...पिनल!!!!
Saturday, June 8, 2013
जिंकण
उन पावसाच्या ह्या खेळात
खरंच कोणी जिंकत नसतरे
बस त्यातला एक एकला
एक एक संधी देत असतो...
मात्र तू नेहमीच आपल्यात
स्पर्धा करत गेलास....
पुढे राहण्यासाठी
मला मागेच सोडत गेलास...
आत्ता मला बोलाऊ नकोस.....
तुझ्या पर्यंतच अंतर
खूप वाढलंय......
ते मला गाठण कठीण आहे
कठीण नाही तर अशक्यच
कारण मला नाही जमणार
तुझ्या सारख वागणं
सर्व काही मागे ठेऊन पुढे
पुढे जान......
~~पिनल चौधरी!!!!
Monday, February 4, 2013
भावली
हो ना!!!!
तुला हवी होती तशीच आहे ना.....
अगदी हुबेहूब अपेक्षां मध्ये बसणारी?
तुझ्या नजरेच्या बेडीत बांधलेली...
बोलण्याच्या प्रत्येक शब्दावर पाउल ठेवणारी....
सगळ सगळ कस मनासारख करणारी.....
तुझी गुणी बायको!!!!!
तुला मिरवता याव म्हणूनच....
........
......
....
..
बिचारी वेडी होती....
तुझ्या अपेक्षांमध्ये प्रेम शोधत होती......
तुला आवडेल अस स्वतःला घडवत होती....
ह्या सर्वानमध्ये ती कुठे दूर हरवून गेली होती
त्या कळीला उमलण्यासाठी शरदाची साथच नव्हती....
तीच तुझ्यावर प्रेम होत रे
त्यामुळे तिला ते सहज जमत होत!!!!!
पण तिला कधी समजलच नाही
नवरा म्हणून.....
ज्याला मिळवण्याचा अट्टहास होता ...
तो नवरा नव्हताच मुळी....
तो कटपुतलीच्या खेळातल्या .....
त्या छोट्याश्या भावलीचा मालक होता.......
दोरया सारया त्याच्या हातात होत्या.....
,,,,,,,,,,,,
.....पिनल!!
Sunday, October 23, 2011
आपल नातं....
रुजायला आपल्या नात्याला
प्रेमाचे पाणी नव्हतेच कधी
बोचणाऱ्या त्या काट्यांना
छाटले कोणी नव्हतेच कधी
उत्तरांच काय घेऊन बसलास
प्रश्नाचा कल्लोळ थांबव जरा
त्याने श्वास जडवले रे
त्यांचे ओझे सोडव जरा
पावलोपावली तुझेच ठसे
टोचता आहेत माझ्या चालण्याला
ओल्या क्षणांची ती माती
फसवते आहे माझ्या जगण्याला
बोलण्याच्या पलीकडले आपले नाते
आता बोलण्याच्या गोंगाटाचे,
कोणा न जमले कुणाच्या
मनातले गोंगाट झोपवणे
त्या हातांचे कधीच सुटणे
आणि फुलपाखरा सारखे रंग देणे
मग त्या रंगांचे नवीन
चित्रातले आयुष्य रंगवणे
~~~`Pinal!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
तू .....
सावलीत तुझ्या विसावले होते.. मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे... मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...
-
आकाशात आहेत असंख्य तारे, तशीच स्वप्न डोळ्यात असंख्य. जिद्द उराशी बाळगून, स्वप्नांसाठी लढणार आयुष्य. संकटांच्या ढगात देखील चंद्रासारखी लपणा...
-
शांत बसले...... डोळे लाऊन मनात डोकावले....... काय काय सापडल ?? धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना...
-
ते क्षण पुरेसे होते का? हा विचार सारखा सतावतो.. आणि तुझ्या विरहाची जाणीव करून देतो... विरह खरच गोड असतो.... अस मला वाटत... कारण त्या विरहात...