Sunday, October 10, 2010

विरह...

ते क्षण पुरेसे होते का?
हा विचार सारखा सतावतो..
आणि तुझ्या विरहाची जाणीव करून देतो...

विरह खरच गोड असतो....
अस मला वाटत...
कारण त्या विरहात तू मला विसरत नाहीस ना !!!

माझी प्रत्येक चांदणीरात्र...
माझा प्रत्येक तापलेला दिवस...
अन माझा प्रत्येक सुगंधित श्वास....
तुलाच अर्पण केला होता...
म्हणूनच विरह सहन करू शकली... कदाचित!!!!

तू असा अथांग सागरा सारखा....
खोल खोल दरी सारखा.....
अन विजेसारखा प्रखर.....
जो मला रोज प्रेमाच्या पावसात चिंब भिजवतो....
ह्या रूपांना कदाचित मी तुझ्या जवळ राहून नसती जणू शकली...
म्हणूनच विरह गोड असतो...

“तू येणार”.....
ह्या वाक्यावर मी माझ्या आयुष्यातले कित्येक दिवस
सहज जगू शकली....
आणि जगता जगता येणाऱ्या स्वप्नांना सजवून
तुझी वाट बघितली...

अन आत्ता तो क्षण आला...
तू सांगाशिलना...
माझी सजावट कशी आहे?
तूला आवडेलना?
तू भरभरून कौतुक करशीलना?

आणि गम्मत बघणा....
मला आपल्या विरहा बद्दल
लिहावसं वाटल तेही...
विरह संपल्यावर..!!!

बस तो क्षण देखील पुरेसा असेल...
तुला जाणवायला...
तुला बघायला...
अन निरंतर प्रेम करायला....
आणि पुढचा विरह हसत जागून
नवी स्वप्न  सजवायला... !!!!

  ~~Pinal 

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...