Friday, December 31, 2010

नको!!!!!!

नको! नको! नको!
आत्ता नको मला त्या प्रेमाच्या कविता....
ज्याच्या त्याच्या ब्लोगवर फक्त प्रेमाच्याच कविता...वीट आला आहे,
कोणला दुसरा कोणता विषयच मिळत नसावा का लिहण्यासाठी???
मग मी विचार करते का बरे असे असावे?????
कदाचित अस असाव प्रेमावर लिहण सोप आहे..... म्हणून कोणी ही प्रेमावर लिहू शकत
तर नाही, आजकल प्रेम म्हणजे अगदी बाजारात मिळणारी भाजी झाली आहे...
लोकांचा प्रेमाचा संदर्भच बदलला आहे....
मग का माझ्या ब्लोगवर नाही का प्रेम-कविता तर आहेत....
पण मी जेव्हा ते अनुभवल तेव्हाच लिहल्या....
मग बाकीचे लोक काय अनुभवाशिवायच लिहिता का(?) तस मी म्हणत नाही.
पण त्यात तो खरे पण मला दिसत नाही...
मग ते कुठे तरी खटकत...आणि खर प्रेम काय असत असा प्रश्न पडतो......
काही तरी लिहण ह्या साठी अस काही वेगळ स्किल लागत नाही, पण आपल्या मनातल खरं नीटपणे वर्णन करणे महत्वाच असत....
खरे पणा हवा लिहण्यात..... बस बाकी काही नाही....
उगीच मुखवटा नको.... 

Wednesday, December 29, 2010

माझे बाबा २

आज पुन्हा मला माझ्या बाबांबद्दल लिहायची संधी मिळाली. खरंच त्यांच्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की काय लिहावे तेच सुचत नाही मग, मला जे जे प्रसंग आठवतात किवां जे जे घडत ते मी लिहून काढते. ह्या आधी देखील मी माझ्या बाबांबद्दल लीहल आहे ह्याच ब्लोगमध्ये “माझे बाबा“ असा एक लेख आहे. आता पुन्हा....
आज जो प्रसंग घडला, ह्या प्रसंगाने मी स्वतःला ओळखलं आणि मला माझे भविष्य स्पष्ट दिसायला लागल. रोज प्रमाणे सकाळी वर्तमानपत्र आले आणि रोज प्रमाणे बाबा ते वर्तमानपत्र वाचत होते आणि मी संगणकावर ई-वर्तमानपत्र वाचत होते. पण आज समजल बाबा जे वाचतात ते माझ्या ई-वर्तमानपत्र खरंच नसत. “आज खऱ्या अर्थाने मी माझ्यातल्या ‘मी’ ला ओळखू शकली.” आणि त्याच श्रेय बाबांनाच जात. ह्या आधी पण मी माझ्या बाबांन बद्दल लीहल आणि आज पुन्हा मला संधी मिळाली,
त्यांनी एक लेख वाचला एका मुली बद्दलचा आणि मला वाच सांगितल, मी तो वाचला, त्या लेखातून घेण्यासारख खूप काही होत आणि मी ते घेतल देखील. त्यात होत, “एक मुलगी लग्न झाल्यावर कशी बदलते आणि संसारात कशी अडकते, पण ह्या सर्व गोष्टीतून तिने कसा वेळ काढला पाहिजे आणि स्वतःतल्या गुणांना कसा वाव दिला पाहिजे, जगा सोबत चालून आपल्या घराला पण कसे चालवावे(?). हे सार होत त्यात, त्या लेखातली ती मुलगी एका मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्या सोबत ती छानस आयुष्य जगते आहे”. पण बाबांनी मला तो लेख देऊन, माझ्याशी न बोलता जे काही बोलले ना ते माझ्या साठी खूप होत, त्या लेखा पेक्षा पण जास्त. त्या लेखातल्या त्या मुलीमध्ये त्यांनी कुठे तरी मला बघितल आणि त्यांना मला ते सांगावसं वाटल आणि खरंच मला जगण्याचा नवा उद्देशच मिळाला आणि खूप आनंद झाला, जो मला ह्या आधी कधीच झाला नव्हता. जाणीव झाली की मी खऱ्या अर्थाने मोठी झाली आहे.
त्यांना मला सांगायच होत तू तुझ्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींचा, गुणांचा आणि माझ्या संस्काराच नाव मोठ्ठ कर. तुझ्यात काही तरी आहे त्याला कधीच तुझ्यातून नष्ट होऊ देऊ नकोस. त्याला तू अत्तरा प्रमाणे जप, जेव्हा केव्हा तू त्याला शिंपडशील तेव्हा तेव्हा ते सुगंध पसरवेल. नेहमी प्रमाणे बाबांनी मला समजावला ते वेगळ्या भाषेत, त्यांचा उद्देश नेहमी असाच, मी काही तरी वेगळ करून दाखवावं असाच आणि त्यांच्या ह्या विश्वासानेच मला एक शक्ती मिळते. त्यांना माझ्यात कुठेतरी एक मोठी व्यक्ती दिसते, मोठी व्यक्ती जगासाठी नाही तर ती त्यांच्यासाठी, त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीला एक सुजाण आणि लोकांनी दखल घ्यावी अशी व्यक्ती झालेलं पाहायच आहे. ह्या बद्दल त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा  त्यांच्या अशीर्वादांवर. 
कधी, कधी असे झाले?
नकळत असे झाले,
स्वप्नाचा जगात कधी पोहचले.

काही गोष्टी अशक्यच असतात का?
त्या फक्त स्वप्नच असतात का?
इच्छाशक्ती सर्वकाही मिळूवून देते.
असतर माझा सोबत झाल नाही.

पण मी, मी आशा सोडली नाही,
मला जे हव ते मिळवणारच,
लढणारच, देवाला सांगणार,
तू मला दिला नाही तरी मी घेणार,


नशीबा पेक्षा कमी-जास्त,
कोणाला काही मिळत नाही,
पण, नशीब आपणच बनवतो,
चंगल कि वाईट

हेच शोधन आयुष आहे,
आयुष्य कसा आहे तेच शोधते आहे.

...पिनल चौधरी

Monday, December 20, 2010

वधू....

क्षणात सारे बदलते आहे....अन बदलणार आहे
स्वप्नाळू मी आजही, अन उद्याही
पण संदर्भ बदलतील स्वप्नांची...                    
          
फक्त स्वप्नाळू नाही तर, जिद्दी ही तेवढीच मी
स्वप्न पूर्तीस नेण्यासाठी... त्यासाठी लाभली होती
सोबत माहेराची आत्ता ती असेल सासरची ही. 

नवी नाती, नवी गोती, घर सोबत सोबत नवी माती...
त्याच मातीला सुगंधित करणार मी प्रेमाच्या,
मायेच्या अन विश्वासाच्या वर्षाधारांनी...


आईच होती प्रत्येक सुख दुखःत, आत्ता मिळणार सोबत सासूची...
बाबांचे शब्द अमूल्य नेहमीच, जगण्याचा दृष्टीकोन दिला त्यांनी
तो तसाच मिळणार आत्ता, सासऱ्यांच्या नजरेतुनी...


भाऊ,बहिण,काका,काकी नाती तीच...पण मणसे नवी..
ही नवी रंग भरली ज्याने माझ्या आयुष्य-चित्रात
असा माझा जीवनसाथी.             


त्याचीच साथ घेऊन चालणार, वाटेत जरी आले काटे
मखमली करणार त्याच्या प्रीतीनी....माझी वाटचाल
स्वप्नांच्या पलीकडल्या नव्या क्षितिजांनासाठी.   

अशी असती माझी सात पाऊले,
देवाला नमुनी मागते शक्ती,
अन सुरवात करते नाव्यायुष्याची!!! 


...पिनल चौधरी!!!

Saturday, October 23, 2010

प्रेम अपुले...

तो वारा... वाहणार 
आपल्या प्रेमाला करतो
सुगंधित.
 
ते ढग.. निळेशार 
आपल्या प्रेमला देतात
छाव.

ते दवबिंदू ... थंडीतले
आपल्या प्रेमला करतात
मोहित.

ते धुकं... पहाटेचे
आपल्या प्रेमाला करतात
गार-गुलाबी.

पावसात..चिंब 
प्रेम आपले नेहमीच
भिजते.


अन मी पण
आपल्या प्रेमला नेहमीच
निसर्गात बसवले.

पण मला प्रेमाला
अस्तिवात जपायच आहे
नैसर्गिक!!!

 
...पिनल चौधरी!!!!

Friday, October 22, 2010

कोजागिरी

आजच चांदण कस सुरेख असते, त्याची तोड कशा सोबत नसते.
अश्या बऱ्याच पोर्णिमा येतात पण ह्याची चमक कोणालाच नसते.
   ह्या चांदण्यातच आपल्या जीवलगासोबत रात्र घालवून प्रेम वाढवायचे असते.
कोजागिरीच्या शुभेछा...!!!!




                              ...पिनल चौधरी.

Thursday, October 21, 2010

पक्षी मनाचा

कळेना मज,
काय खुणावतो
पक्षी मनाचा.

मुक्त विहंगायचे
त्यास इथे...
की शोध असे नव्या आभाळा...

कुठवरी जावे...
दूर....दूर...
की थांबावे इथे....

गोंधळात असे सदा
ह्याला न कळे....
कसे जगता.... 


  -पिनल चौधरी

Wednesday, October 13, 2010

मी!!!

मी!!
स्वप्नात जगणारी...
पण तीच स्वप्न खरी करणार
ह्याची जिद्द बाळगणारी.

मी!!
मनातल कमी बोलणारी...
पण मनातल बोलणार,
ते वेगळ्या मार्गाने.

मी!!
पावसात चिंब भिजणारी...
सर्वांसारखीच...
पण पावसाचा अर्थ समजून घेणारी...

मी!!
सर्वांसोबत जगणारी..
पण सर्वांसोबत असूनही
स्वतःच अस्तित्व स्वतः जपणारी.

मी!!
विश्वासावर दृढ विश्वास ठेवणारी
आणि त्या विश्वासानेच
नाती जपणारी...

मी!!
साहित्येच्या बागेतली
शब्द फुले वेचणारी
माळी....

मी!!
मानाने जगणारी...
मनाच्या वाटेवर
दूर दूर चालणारी ..

मी!!
हो मी..
मनाच्या वाटेवरची
वाटेकरू ....

-पिनल चौधरी 

Sunday, October 10, 2010

विरह...

ते क्षण पुरेसे होते का?
हा विचार सारखा सतावतो..
आणि तुझ्या विरहाची जाणीव करून देतो...

विरह खरच गोड असतो....
अस मला वाटत...
कारण त्या विरहात तू मला विसरत नाहीस ना !!!

माझी प्रत्येक चांदणीरात्र...
माझा प्रत्येक तापलेला दिवस...
अन माझा प्रत्येक सुगंधित श्वास....
तुलाच अर्पण केला होता...
म्हणूनच विरह सहन करू शकली... कदाचित!!!!

तू असा अथांग सागरा सारखा....
खोल खोल दरी सारखा.....
अन विजेसारखा प्रखर.....
जो मला रोज प्रेमाच्या पावसात चिंब भिजवतो....
ह्या रूपांना कदाचित मी तुझ्या जवळ राहून नसती जणू शकली...
म्हणूनच विरह गोड असतो...

“तू येणार”.....
ह्या वाक्यावर मी माझ्या आयुष्यातले कित्येक दिवस
सहज जगू शकली....
आणि जगता जगता येणाऱ्या स्वप्नांना सजवून
तुझी वाट बघितली...

अन आत्ता तो क्षण आला...
तू सांगाशिलना...
माझी सजावट कशी आहे?
तूला आवडेलना?
तू भरभरून कौतुक करशीलना?

आणि गम्मत बघणा....
मला आपल्या विरहा बद्दल
लिहावसं वाटल तेही...
विरह संपल्यावर..!!!

बस तो क्षण देखील पुरेसा असेल...
तुला जाणवायला...
तुला बघायला...
अन निरंतर प्रेम करायला....
आणि पुढचा विरह हसत जागून
नवी स्वप्न  सजवायला... !!!!

  ...पिनल चौधरी!!!!

विरह...

ते क्षण पुरेसे होते का?
हा विचार सारखा सतावतो..
आणि तुझ्या विरहाची जाणीव करून देतो...

विरह खरच गोड असतो....
अस मला वाटत...
कारण त्या विरहात तू मला विसरत नाहीस ना !!!

माझी प्रत्येक चांदणीरात्र...
माझा प्रत्येक तापलेला दिवस...
अन माझा प्रत्येक सुगंधित श्वास....
तुलाच अर्पण केला होता...
म्हणूनच विरह सहन करू शकली... कदाचित!!!!

तू असा अथांग सागरा सारखा....
खोल खोल दरी सारखा.....
अन विजेसारखा प्रखर.....
जो मला रोज प्रेमाच्या पावसात चिंब भिजवतो....
ह्या रूपांना कदाचित मी तुझ्या जवळ राहून नसती जणू शकली...
म्हणूनच विरह गोड असतो...

“तू येणार”.....
ह्या वाक्यावर मी माझ्या आयुष्यातले कित्येक दिवस
सहज जगू शकली....
आणि जगता जगता येणाऱ्या स्वप्नांना सजवून
तुझी वाट बघितली...

अन आत्ता तो क्षण आला...
तू सांगाशिलना...
माझी सजावट कशी आहे?
तूला आवडेलना?
तू भरभरून कौतुक करशीलना?

आणि गम्मत बघणा....
मला आपल्या विरहा बद्दल
लिहावसं वाटल तेही...
विरह संपल्यावर..!!!

बस तो क्षण देखील पुरेसा असेल...
तुला जाणवायला...
तुला बघायला...
अन निरंतर प्रेम करायला....
आणि पुढचा विरह हसत जागून
नवी स्वप्न  सजवायला... !!!!

  ~~Pinal 

Monday, October 4, 2010

मैत्री

जगातल्या सुंदर आणि निरागस अश्या नात्या बद्दल काहीतरी....  

मैत्री... तुझी
तिला ना किनारा समुद्राचा
ना तिला क्षितीज आकाशाची
ना तिला हसू आनंदाचे
ना रडू दुखःचे

तिला ना कशाची तमा न भान जगाचे
स्वतःतच हरवलेली ती  
खोल खोल समुद्रासारखी
अन आकाशात मुक्त विहंगणारी

अविरत अशी जळणारी
जळून पण मागे धूर आणि राख ठेवणारी   
आठवणीत त्याच धुराने पाणी आणणारी
राख तिची औषधा समान भासणारी

वर्तमानत असले सोबत जरी
भूत भविष्याला जोडून ठेवणारी
अस्तित्वातच खरतर ती
रमणारी... मनसोक्त

ती मला ना मी तिला 
सोडणार... श्वासा समान
त्याचा न प्रयत्न ना धडपड
नैसर्गिकच ते नातच अस ....

... पिनल चौधरी!!!

Sunday, October 3, 2010

मनमर्जी

बघ कशी हसते ती(मनमर्जी) माझा कडे बघून....
खूप राग येतो मला तिचा..
हेवा तर अनावर वाटतो.....
म्हणे तिला बंधन नाहीत....
ती बागडते, हिंडते...
मुक्त विहरते मनात येईल तेव्हा...!!!!!
असो.. पण मग
मला मला तीच्या मुळे माझ्या स्वातंत्र्याचा भास होतो....
हो भाससच तो....
कारण अस म्हणतात ना गेलेल्या गोष्टींचा
भासच होत असतो... म्हणून कदाचित... 
मग त्याला शोधण्यात मी गांगरून जाते....
गांगरलेली बघून मग पुन्हा ती(मनमर्जी) मला हसते
अन मी तिच्या कडे बघते मिश्कील नजरेने........


...पिनल चौधरी

.....

त्याच्या विचारात बघ....
कस मन बावरत....
त्याला सावरता....
अजूनच धावत त्याच्या पाठी...

त्याची स्वप्ने ....
त्याचा नाद...
त्याचच सार...
मग माझा असे नुसताच भास...

पापणी वरल...
दवबिंदू...
मोती होण्याआधी
त्याच्या नजरेला शोधत....

त्याची नजर,
भिडताच.....
माझी पापणी झुकताच....
ते घरंगळत....  
  
...पिनल चौधरी!!!

Friday, October 1, 2010

भीती.

भीती...
मला नेहामी वाटत माणसाच्या जगण्याचा उद्देश त्याच्या भीतीतून निर्माण होतो, कुठे त्याची भीती खरी तर नाही ना होणार?? ह्या विचाराने..... मग सुरु होतात त्याचे पराकाश्तीचे प्रयत्न, धडपड, आटापिटा त्याला थांबवण्याचा मग खरा प्रवास सुरु होतो आयुष्यचा. कदाचित म्हणूनच माणूस भीतीला भीत भीत जगण्याचा खरा आनंद हरवून बसतो....
आणि तशेच काहीसे मी अनुभवले...
पण माझी भीती वेगळीच “माझी भती अशी की कुठे मी ती भीती खरी होऊ न देण्याच्या भीतीत तर जगणार नाही ना” थोड कठीण आहे पण खर आहे.


माझ्याच विचारांची मशाल घेऊन
प्रकाश करायला निघाली
माझ्या अंधारमयी जीवनात आणि
त्या आगीत जळत राहिला माझा विश्वास

त्याची मला न कल्पना होती
न त्याची जाणीव,
विश्वासाला जाळून मी
कस करेल स्वतःला प्रकशित?

इथवर पेटत आली ती
मशाल माझ्याच सोबतीत,
पण सोबत हरवली माझी
मग कस येणार ते तेज माशालीस  

असेल प्रकाश निराळा अमुचा
असा होता दावा,
स्वतःच कधी राख होऊन
गेलो अश्रुत मिसळून. 

गमावली मी ती शक्ती अन उमेद
पुन्हा पेट घेण्याची....
बस मग मी झाली पक्षी पिंजरयातली.....
अन होती खरतर त्याचीच भीती.
  
...पिनल चौधरी 

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...