Sunday, October 9, 2011

सुख-दुःख



अश्रुनी मी लाचार नाही
न मी दुःखाची ओझी वाहणारी
माझ्यात एक ठिणगी
सुखाला शोधायला वणवा पेटवणारी

दुःख हे जीवनाचे दुसरे नाव
त्याच्या शिवाय न त्याला भाव
पण दुःखाच्या पाठी नेहमी
उभे आहे सुखाचे नाव

सुख सुख म्हणजे तरी काय?
आनंद हसू कि अजून दुसरे काय(?)
सुख म्हणजे तर चेहऱ्यावरील
समाधानाची छबी अन बाकी काय

~~पिनल!!!!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...