Wednesday, December 29, 2010

माझे बाबा २

आज पुन्हा मला माझ्या बाबांबद्दल लिहायची संधी मिळाली. खरंच त्यांच्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की काय लिहावे तेच सुचत नाही मग, मला जे जे प्रसंग आठवतात किवां जे जे घडत ते मी लिहून काढते. ह्या आधी देखील मी माझ्या बाबांबद्दल लीहल आहे ह्याच ब्लोगमध्ये “माझे बाबा“ असा एक लेख आहे. आता पुन्हा....
आज जो प्रसंग घडला, ह्या प्रसंगाने मी स्वतःला ओळखलं आणि मला माझे भविष्य स्पष्ट दिसायला लागल. रोज प्रमाणे सकाळी वर्तमानपत्र आले आणि रोज प्रमाणे बाबा ते वर्तमानपत्र वाचत होते आणि मी संगणकावर ई-वर्तमानपत्र वाचत होते. पण आज समजल बाबा जे वाचतात ते माझ्या ई-वर्तमानपत्र खरंच नसत. “आज खऱ्या अर्थाने मी माझ्यातल्या ‘मी’ ला ओळखू शकली.” आणि त्याच श्रेय बाबांनाच जात. ह्या आधी पण मी माझ्या बाबांन बद्दल लीहल आणि आज पुन्हा मला संधी मिळाली,
त्यांनी एक लेख वाचला एका मुली बद्दलचा आणि मला वाच सांगितल, मी तो वाचला, त्या लेखातून घेण्यासारख खूप काही होत आणि मी ते घेतल देखील. त्यात होत, “एक मुलगी लग्न झाल्यावर कशी बदलते आणि संसारात कशी अडकते, पण ह्या सर्व गोष्टीतून तिने कसा वेळ काढला पाहिजे आणि स्वतःतल्या गुणांना कसा वाव दिला पाहिजे, जगा सोबत चालून आपल्या घराला पण कसे चालवावे(?). हे सार होत त्यात, त्या लेखातली ती मुलगी एका मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्या सोबत ती छानस आयुष्य जगते आहे”. पण बाबांनी मला तो लेख देऊन, माझ्याशी न बोलता जे काही बोलले ना ते माझ्या साठी खूप होत, त्या लेखा पेक्षा पण जास्त. त्या लेखातल्या त्या मुलीमध्ये त्यांनी कुठे तरी मला बघितल आणि त्यांना मला ते सांगावसं वाटल आणि खरंच मला जगण्याचा नवा उद्देशच मिळाला आणि खूप आनंद झाला, जो मला ह्या आधी कधीच झाला नव्हता. जाणीव झाली की मी खऱ्या अर्थाने मोठी झाली आहे.
त्यांना मला सांगायच होत तू तुझ्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींचा, गुणांचा आणि माझ्या संस्काराच नाव मोठ्ठ कर. तुझ्यात काही तरी आहे त्याला कधीच तुझ्यातून नष्ट होऊ देऊ नकोस. त्याला तू अत्तरा प्रमाणे जप, जेव्हा केव्हा तू त्याला शिंपडशील तेव्हा तेव्हा ते सुगंध पसरवेल. नेहमी प्रमाणे बाबांनी मला समजावला ते वेगळ्या भाषेत, त्यांचा उद्देश नेहमी असाच, मी काही तरी वेगळ करून दाखवावं असाच आणि त्यांच्या ह्या विश्वासानेच मला एक शक्ती मिळते. त्यांना माझ्यात कुठेतरी एक मोठी व्यक्ती दिसते, मोठी व्यक्ती जगासाठी नाही तर ती त्यांच्यासाठी, त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीला एक सुजाण आणि लोकांनी दखल घ्यावी अशी व्यक्ती झालेलं पाहायच आहे. ह्या बद्दल त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा  त्यांच्या अशीर्वादांवर. 

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...