Monday, January 10, 2011

कविता!!!

कविता..
कश्या त्या मनातल
ओकून टाकतात
सांडून टाकतात
साऱ्या भावना
.....
कविता
साऱ्यांच्याच नसतात
वाचण्याजोग्या
साऱ्यांना नाही
येत मांडता
.......
कविता
बस त्या जमतात
मनात काही नसतांना
आणि कधी जमतच नाही
मनात खूप काही असतांना
.....
कविता
कधी बोलतात
पण कधी खूप सांगून
देखील शांत
वाळवंटा सारख्या
......
कविता
त्या माझ्या
सोबती सख्या
त्या देखील
माझ्या सवे जगतात
......  


....पिनल चौधरी!!

1 comment:

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...