Tuesday, June 16, 2015

हरवलेली!


का कुणास ठाऊक आज 
अचानक मन अगदी 
मागच्या काळात गेल.

दूर दूर आत चालत ते 
पूर्वीच्या....
परस बागेत गेल.

खूप गोष्टी डोळ्या समोर आल्या.....
एक एक करत..... 
सगळ दाखवून गेल्या.

अगदी माझीच पिटुकली पावलं....
घरभर असलेली आणि 
माझीच उंबरठा ओलांडलेली पाउलखुण.

सारच बदल आहे, त्या प्रत्येक
क्षणाने वेगळच रूप घेतल आहे.

माझीच मला ओळख 
वाटेनाशी झाली आहे.... 
शोधते आहे....

माझ्यातली मी....
माझ्यातली माझी”.....

माझ्यातली ती.... 

माझ्यातली ???.....
हरवली आहे का?

-पिनल चौधरी 

2 comments:

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...