Sunday, June 12, 2011

पाऊस ...... कि-उत(?)



गवताची पाती!!!

अन नुकतीच फुललेली कळी!!!

प्रतीक्षेत सारे..... त्या गार पावसाच्या थेंबाच्या.....


 

ती दुपार पार उन्हात न्ह्यालेली!!

चटके त्या रस्त्याने सोसलेली!!

यांनाही लाभणार सुख त्या थेंबांनी.....



संध्याकाळ ती तापलेली... त्यात

बागांना देखील शापाची भीती.....

बस!!! एका थेंबाने न्हाऊन उठणार हे ही....



पावसाची त्यात मेहरबानी....

धो धो बरसण्याची!!

सर्वांना चिंब भिजवून....

तृप्त आत्म्यांचा आशीर्वाद घेण्याची.....



पावसाच्या थेंबा थेंबात

जीवन शोधणारे....

सारे!! सुखाने न्हाऊन निघाले!!!



मानवी मनाची भारीच काळजी पावसाला!!

त्यांच्या भरण्याची सोय....

पावसाने करून ठेवली...!!!



पण!!!

मानवी मन ते....

मन भरत नाही तोवरच...

पावसाला शिव्या द्यायला सज्ज!!



~~~पिनल----

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...