Friday, June 17, 2011

बाजार भाव...
बाजार भाव आलाच नसता
माझ्या स्वप्नांना कदाचित,
कारण ती इतकी अनमोल होती
कि बाजारात विकलीच गेली नसती

मी त्यांचा बाजार मांडावा
अस नाहीच मुळी....
पण त्यांना जपून पण
मला काय लागणार होता हाती?
पण त्यांना विकाव
कारण मग माझ्याच
घरात त्यांची अडगळ न बनावी.

विकत घेणारा त्याला...
त्याच्या घरात त्यांना
तो सुरेख सजवून ठेवेल
त्या निमिताने त्यांची
जपन तरी करेल.
का नाही त्याने त्या साठी
चार पैसे जे खर्च केले असतील!

मग मी आपली
त्याच्या कडे गुपचूप जाऊन
स्वप्नाची खुशाली बघून
मनात बस समाधानी बनेल(?)

~~~पिनल!!

No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...