Wednesday, July 13, 2011

भावना!!!

भावनांच्या ह्या गर्दीत कुठे

हरवली कदाचित मी...

अन भावनांना आवर घालता घालता...

बेभान झाली मी..इतरांसाठी.... ह्या भावनांना

लपवणे आणि बांध घालणे,

आवरणे त्यांना....

अन मग वाटते एक दिवस

ह्या भावनांनाच बांधून

माडीवर टाकावे..नाही कोणाचा आरोप

नाही कोणाची तक्रार मझवर

पण माझ्याच तत्वांची

सीमारेषा मला येते आड...

ह्या तत्वांचे मग पारडे जड होते

अन मी पुन्हा त्या

भावनांच्या गठीत कुठेतरी

गुरफटून जाते....


~~पिनल!!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...