Tuesday, July 19, 2011

रात्रीच्या त्या चांदण्या....

रात्रीच्या त्या चांदण्या....
लुकलुकणाऱ्या तुझ्याच आठवणीत,
तुझ्या नसण्याचा तो
घाव भरण्यासाठी...

पंघारल्या होत्या त्यांनाच
मी रडणाऱ्या थंडीत,
त्यांनी हि कापसा सारख जपल रे
क्षणा क्षणाला तुझी म्हणून

आजही तश्याच आहेत त्या
माझी राखण करीत,
रात्रीच्या एकलेपणाला
तुझ्या असण्याचा प्रकाश पसरवीत

पण आत्ता माझ्या सोबतीला तू
अन...त्या मात्र कुठेतरी
एकट्या...........माझ्या सुखाचा....
आनंद साजरा करीत....~~~पिनल!!

No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...