Monday, July 11, 2011

ओघळनारया त्या आठवणी!!!!

ओघळनारया त्या आठवणी

मनाला स्पर्शून.... दूर गेलेल्या,
पाण्यासारख्याच त्या...
सावरतांना, ओंजळीत थेंबभर मावणाऱ्या!

थेंब थेंब आठवणी
सावरत....बावरणारी मी
जिद्द, पाण्याला मुठीत घेऊन
त्याचे तळे बनवण्याची...

अशीच मग
मी निवांत....
त्या तळ्याकाठी
हरवलेली....

ह्या जीवनाच्या पसाऱ्यातून...
दूर दूर गेलेली...
अन क्षणभर स्वतःत
हरवण्याचा आनंद घेणारी...


~~पिनल!!!

No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...