Monday, December 20, 2010

वधू....

क्षणात सारे बदलते आहे....अन बदलणार आहे
स्वप्नाळू मी आजही, अन उद्याही
पण संदर्भ बदलतील स्वप्नांची...                    
          
फक्त स्वप्नाळू नाही तर, जिद्दी ही तेवढीच मी
स्वप्न पूर्तीस नेण्यासाठी... त्यासाठी लाभली होती
सोबत माहेराची आत्ता ती असेल सासरची ही. 

नवी नाती, नवी गोती, घर सोबत सोबत नवी माती...
त्याच मातीला सुगंधित करणार मी प्रेमाच्या,
मायेच्या अन विश्वासाच्या वर्षाधारांनी...


आईच होती प्रत्येक सुख दुखःत, आत्ता मिळणार सोबत सासूची...
बाबांचे शब्द अमूल्य नेहमीच, जगण्याचा दृष्टीकोन दिला त्यांनी
तो तसाच मिळणार आत्ता, सासऱ्यांच्या नजरेतुनी...


भाऊ,बहिण,काका,काकी नाती तीच...पण मणसे नवी..
ही नवी रंग भरली ज्याने माझ्या आयुष्य-चित्रात
असा माझा जीवनसाथी.             


त्याचीच साथ घेऊन चालणार, वाटेत जरी आले काटे
मखमली करणार त्याच्या प्रीतीनी....माझी वाटचाल
स्वप्नांच्या पलीकडल्या नव्या क्षितिजांनासाठी.   

अशी असती माझी सात पाऊले,
देवाला नमुनी मागते शक्ती,
अन सुरवात करते नाव्यायुष्याची!!! 


...पिनल चौधरी!!!

8 comments:

  1. सगळ्या मुलींनी मंगल अष्टका चालू असताना असाच मनात विचार करायला हवा ..
    छान आहे कविता ...

    ReplyDelete
  2. धन्यवाद!!!!
    तुझी प्रतिक्रिया आवडली... त्यात तू...माझ्यासारखा विचार मुलींनी करायला हवा असा व्यक्त केल ते खरंच आवडल.

    ReplyDelete
  3. Nice one...!!!
    :-)
    Khoop positive wichar aahet...eravi vadhuche manogat vaigare madhye emmo part jast asto...smthng unique...nice...!!!

    ReplyDelete
  4. hey thnx n seen ur blog its also nice... !!!!
    thnx again :)

    ReplyDelete
  5. पिनल,
    माझं नुकतंच लग्न ठरलं आहे. मी माझ्या भावी बायकोशी बोलत असतांना ती याच भावना व्यक्त करत असते. मला असं वाटतंय की तू तिच्या भावना प्रातिनिधिक स्वरुपात अगदी योग्य श्ब्दात व्यक्त केल्या आहेत. मन:पूर्वक धन्यवाद!

    ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...