Sunday, April 17, 2011

प्रश्न????

बस एक सर्व सामान्यांसारखी
माझी जीवन गाथा?
मग काय अर्थ त्या जगण्याला?
काही तरी कर्तुत्व करून दाखवावे,
चार लोकांनी आपल्याला आठवावे,
लोकांनी आठवण करावी म्हणून
चांगली काम करायची?
की स्वतःच्या मनाल पटतात म्हणून?
बरीच प्रश्न माझी जगण्याविषयी
आणि एक दिवस ह्या प्रश्नांन मधूनच
घडवायचे मज माझे सुंदर जगणे.
त्या साठी लाभली मला
किल्ली आत्मविश्वासाची
आणि त्या किल्लीने उघढेल मी
ह्याच प्रश्नांच्या तिजोरीस!!!! 

~~पिनल!!!!

No comments:

Post a Comment

माझे.......

शांत बसले...... डोळे लाऊन मनात डोकावले....... काय काय सापडल ?? धूळ खात पडलेली मनाची कोरी पाटी जीच्यावर मी स्वतःच्या विचारांना ...