Wednesday, March 2, 2011

हेच का आयुष्य ????


फुलाच्या कळीला....
हो फुलाच्या कळीला उगीच तोडले...
काय बर मिळाले त्या क्रूर माणसला तोडून?
ती नाजूक सुंदर काळी....
स्वप्न सजवून बसली होती त्या लहानश्या फांदीच्या जगात.
हो तीच स्वप्न...... जी प्रत्येक कळी बघते.....
आपले रूप ह्याहून सुंदर होणार.....
कळीचे आपण सुरेख से फुल होणार....
हो तेच फुल...जे जगात सर्वात देखणं म्हणून ओळखलं जात...
त्याचा उपयोग देवला प्रसन्न करण्या पासून...
तर अंत यात्रेत प्रेतावर टाकण्या पर्यंत होतो.
तिने स्वप्न बघितली काय बरं चुकल तीच?
कोनालाच हक्क दिला नाही तिने, तिच्या आयुष्याचा नाश करायचा.
...........
तिची त्या फुलपाखरा सोबत मैत्री होती....
त्यांच्या नात्यात एक वेगळीच घट्ट अशी वीन होती....
कोणी समजू न-शकण्या जोगी.....
आणि खरंच कोणीच ती समजू नाही शकल...
मुसू-मुसू रडल ते फुलपाखरू बस!!!!
ते ही काय करणार ना बिच्चार?
लहानस फुलपाखरू ते...
ह्या मोठ्या जगात..
कोण ऐकणार त्याच्या???

1 comment:

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...