Saturday, March 12, 2011

रात्र....

चंदनी रात्र..


मला नेहमीच भावली...
साथ तिची माल..
त्या सूर्याच्या अगमनास्तोवर...
माझे हितगुज तिच्या सवे...
आणि ती अशी चूप चाप.... भयाण रात्र...
पण ती कोणाला काहीच न सांगणारी...
परत येणारी कालचे हितगुज विसरलेली..
नवी कोरी रात्र...
त्या अंधारात का कुणास ठाऊक तिला मी दिसते का??
आमची ओळख...
तिला-माझी, माझ्या आवाजाने...
अन मला-तिची तिच्या शांत, काळोख अस्तित्वाने...
ती दुवा दोन दिवसांचा..          
अन माझ्या रोजच्या परीक्षेचा....
रात्र...

--पिनल!!!


No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...