Thursday, March 24, 2011

कविता... माझ्या नवऱ्यासाठी लिहिलेली, त्याच्या जन्मदिवशी....


आठवले ते दिवस आठवातले की... स्वतःशीच होते हितगुज,
मग खूप आनंद, आणि मग हसण हळूच लाजून!!!

तुझ्या अस्तित्वाचे हे मूल्य पुरे,  मज जगावया आयुष्य...
सोबत तुझ्या साथीची, द्यायला त्यास अर्थ!!

तुझ्या असण्याचे चांदणे  शिंपले गेले कधीच माझ्या जगण्यावर
मग नको मला शोध स्वतःचा, जर ओळख असे तुझ्यावर....

ह्या आपल्या नात्यात..
उदारतेच प्रेम अतूट वसे ...
आपल्या दोघांच्या डावाला तेज सूर्याचे ...
आयुष्यातील वळणे चंद्राच्या शीतल छायेत कोरू देत..
अन त्या वळणावर मिळू देत चिरकाल सुख देव-आशीर्वादात...
अतित्वातले आदर्शवादी आपले जगणे मग जमवूयात ...

मिळू देत तुला भरभरून माया,आपुलकी,  
बरसु देत यशो,धन वृष्टी,
असू देत छाया देवाची संरक्षणरूपी.
जगू दे मज....
अन जगणे माझे लपले तुझ्या खळखळून हसण्यावर ....  
नकोत कधी काळे आभाळ वेदनांचे तुझ्यावर
जरी केली गर्दी त्यांनी करेल मी मात त्यांच्यावर...
जन्म माझा तुला जपावयात...
देव करो होवो त्याचे सार्थक...

हा दिवस खरंच माझ्या साठी अनमोल  
कारण तुझ्या जन्माने देखील मला मोल..
अजूनही मी साद घालते आपल्या भेटीच्या त्या क्षणाला
त्यानेच भरभरून सुख आले माझ्या पदराला...

जग अस्तिवात राहून
आपल्या स्वछंदी आकाशी-महलात
अन त्या ताऱ्यांना आणून
चमकऊन टाक तुझ्या कर्तृत्वास!!!!

~~~ सौ पिनल भूषण चौधरी!!!

3 comments:

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...