सुंदरता!
कोणी केली ह्याची व्याख्या? खर तर प्रत्येकाच्या लेखी ती वेगळीच असते.
आणि ती त्यांच्या विचारावर अवलंबून असते. तर का? जो जसा विचार करेल तसा तो समोरच्याची सुंदरता बघेल. मग ती चेहऱ्याची असो वा शरीराची असो वा मनाची असो.
पण मला नेहमी वाटते की खरच का समोरच्याच मन जिंकण्या साठी चेहऱ्याची किवा शरीराची सुंदरता महत्वाची असते? तस तर प्रत्येक वयात एक वेगळीच सुंदरता असते.
जसे लहान मुलात पहिला तर त्याची खरी सुंदरता असते ती त्याच्या निरागसतेत, किती छान असते ती, फत्त एक सेकंदासाठी डोळे मिटा आणि बघा गोड बाळ डोळ्या समोर येईल आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता किती छान. कती निरागस.
नंतर मग सुंदरतेची व्याख्या बदलते आणि खरी सुंदरता समजते, ती तरुण वयात, मग ती नेहमीच हवी हवी वाटते वेग वेगळ्या रुपात. तरुण वयात आपण खुप वेळा चेहऱ्याच्या सुंदरतेला महत्व देतो अन ते स्वाभाविकच असते, त्यात पण एक वेगळाच आनंद असतो आणि जस म्हणतात तरूणवय परत कधीच येत नसत अगदी तसच त्या वयातली सुंदरता परत कधीच येत नाही.

अश्या माझ्या व्याख्या आहेत सुंदरतेच्या, म्हणून म्हणतात “बघणाऱ्याच्या डोळ्यात सौंदर्य असते” खरच ते असते. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,
कितपत योग्य आहे बाह्य सुंदरता बघणं? मनाची सुंदरता महत्वाची, मन जितक सुंदर तितक जग सुंदर, आणि तीच व्यक्ती सर्व जगाला जिंकू शकते, आणि हो त्या व्यक्तीला मग बाह्य सुंदरता महत्वाची वाटत नाही. मग परत एक विचार येतो मनात, आपण बाह्य सुंदरते कडे लक्ष द्याचच नाही का? पण नाही ती पण महत्त्वाची आहे कारण आपल दिसणं, बोलणं, वागणं महत्त्वाच आहे म्हणून मी स्वःता च्या बाह्य सुंदरतेला बघते कारण छान राहण्याने आपल मन प्रसन्न रहाते, पण पुन्हा तेच ते एका सिमेपर्येंत.
मी नेहमी माणसांच्या मनाच्या सुंदरतेला जाणून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे मग मला त्या माणसांणच्या सोबत वागायला, बोलायला त्रास तसा होत नाही आणि मग त्यांच्या मनाच्या सुंदरतेला महत्व दिले की मी आपोआपच मानाने सुंदर लोंकाचा सहवास असते आणि मग माझ मन अजून सुंदर होते, आणि कोणी अस म्हंटल की आजकल चंगल्या मनाचे लोकच कुठे सापडतात, तर ती माझा कडे सापडतात.
मनाची सुंदरता शब्दात नाही सांगता येणार
मनाची सुंदरता सुंदर मनालाच ओळखता येते.
तस जग खुप छान आहे, आपण ते बघीतल तर,
आपल्या बघण्याच्या दृष्टीत सार असत.
म्हणूनच जगाची सुंदरता बघायची असेल तर
दृष्टी बदलावी लागते, अन त्यात ती जमण महत्वाच.
ज्याला जमल त्याने जग जिंकाल,
आणि जग जिंकणारा सर्वात मोठा विजेता.
अन तेच मी मझ्या ह्या लहानश्या आयुष्यात
प्रयत्न करते तो मोठा विजेता होण्याचा.
माहित आहे ते तेवढ सोप नाही
अशक्य पण तर नाही ना.
....पिनल चौधरी
....पिनल चौधरी