Tuesday, August 17, 2010

मनोमिलन....

कसे सांगू मी काय वाटत, त्याच्या सोबत असतांना,
जगात अशी कुठली जागा नाही, आणि अशी कुठली वेळ नाही.
का होत असाव अस, रोज असा प्रश्न स्वतःलाच विचारते,
आणि मग मला त्याच्या कडेच उत्तर सापडत.

मग कधी वाटत हा सर्व मनाचा खेळ आहे,
मग वाटते नाही कदाचित त्याच्यातच काही तरी आहे,
पण मग मनाला समजावते,
तूच भानावर नाहीस.

पण मी माझ्या मनाला का दोष द्यावा?
त्याचच मन माझ्या मनाच्या प्रेमात पडल असेल.
आणि लोक म्हणतात ती त्याच्या प्रेमात पडली.
पण माणूस मुळात कोणाच्या प्रेमात पडतच नाही, मनं पडतात.....  


....पिनल चौधरी

No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...