Friday, August 13, 2010

वेगळी काम... आजही असाच एक दिवस उगवला जसा रोज उगवतो, आणि असाच दिवस ज्यात आपण रोजची कामे करत असतो, आणि असा सहजच विचार आला मनात, का करतो आपण कारण लहानपणीच ती आपल्यला शिकवली जातात म्हणून ती अंगवळणी पडतात, की सर्व करतात म्हणून, पण कुणास ठाऊक नेमकी तीच काम करायचा मला कंटाळा येतो.
नाही तस नाही.... मला पण शिकवली गेली ती लहानपणीच पण एकच ती माझा अंगवळणी पडलीच नाही......पण मला वाटले का करावी ती कामे... अन वेगळी काम करून दाखवण्या साठीच, त्या माझ्या अंगवळणी नाही पडल्या कदाचित....
बरेच लोक म्हणतात वेगळ करून दाखवणं सोप नाही, त्यासाठी खुप कष्ट घ्यावी लागत, खुप मेहनत करावी लागते....आता मला सांगा वेगळ करून दाखवण्याची व्याख्या काय आहे?
वेगळी काम, अगदी कोणी नाही केली अशी काही तरी, की लोकांनी म्हणाव अस काय केलत...
छे..
वेगळी काम म्हणजे तुम्ही तीच काम करा जी सर्व करतात, म्हणजे तुम्ही तुमची कर्तव्य जरी केलीतना तरी चालेल.. आणि तीच काम आजकल वेगळी झाली आहेत... आणि त्याकडेच सर्व दुर्लक्ष करतात आणि मला तीच करून दाखवायची आहेतमी वेगळ अस काही करणार नाही, पण तीच काम अशी करीन जी कधीच कोणी त्या पद्धतीने केलीच नाहीत....  
आणि असच मला करून दाखवायच आहे.....वेगळी काम जी मी माझ्या पद्धतीने करणार...
आणि हो मला वाटत ही कठीण नाहीत.....   

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...