“त्या दिवशी कुणास ठाऊक पण स्वतःचेच छायाचित्र(फोटो) बघत बसलेली आणि मग स्वतःच्याच शोधात रमलेली”
माझा बालपणीचा एक फोटो...मी निरीक्षण करत होती एवढी लहान होती मी...
एवढी मोठी झाली पण कधी? आणि कदाचित त्या दिवशी मला अस समजल की म्हणूनच फोटो काढायचे असतात.मग अपली सारखी विचारात पडायची, आत्ता पर्यंतच्या सर्व दिवसात काय काय बदल घडले?मी १ वर्षाची होती आणि आत्ता मी ... वर्षांची झाली(मुलगी आहे न वय नाही सांगणार) ते सोडा,मग मी लहान असताना केलेल्या चुका त्यासाठी आईचा मिळालेला मार, धपाटे, बाबांनी रागावलेले दिवस सर्व आठवत, पण खर सांगू का मला न बाबांनी कधी रागावलेच नाही खरच त्यात आश्चर्य आहे पण मला आठवत नाही कि बाबा मला रागावलेले, मला खूप बोलेले. त्यांची रागावण्याची भाषाच निराळी होती कि त्यांची कधी भीतीच वाटली नाही आणि मग मी चूक केली जरीना की स्वतःच जाऊन सांगायची आणि बाबा समजावून सांगत त्यामुळे नंतर ती चूक नाही घडायची, त्यात त्यांच प्रेम, काळजी, लाड असायचे. त्यांच एक तत्व आहे मुलांना धाक दाखऊ नका त्यांना समजून घ्या आणि ते मला आत्ता पटत आहे. बाबांच्या ह्या वागण्यावरून आई सारखी बोलायची अजूनही नेहमी बोलत असते तुमच्या लाडान पोरगी बिघडली आहे, पण बाबांना त्याच देखील हसू येत, कारण त्यांच्या शिवाय मला खरच कोणी समजू नाही शकत. मी आधी पासूनच बाबांच्या जवळची, बाबांची लाडकी, आत्ता परिस्थिती बदली नाही आणि माझ पण तेच बाबाच मला नेहमी जवळचे वाटतात म्हणजे अगदी मैत्रिणी पेक्षा पण आणि आई पेक्षाही. मला काही करावस, बोलावसं, मागावस वाटला न तर आपोआपच बाबा आठवतात.

पण भीती तीच जी प्रत्येक मुलीला वाटते ती कि नंतर मी लग्न करून दुसऱ्या घरात जाईल तेव्हा, अस वाटल आणि आपोआप बाबा आठवले तर तेव्हा मी काय करेल. माझा सोबत बाबा नसतील तेव्हा. ते सोबत असतीलपण परंतु परिस्थिती वेगळी असेल, मग तेव्हा मी कमजोर बनेल. तर नाही कठीण परीस्थितीत मला ठामपणे उभ राहणं शिकवल आहे माझा बाबांनी. जसे वडाच झाड उभा राहतना अगदी तसच, वडाचच झाड का, तर माझा घरा जवळ वडाच झाड आहे आणि त्याला बघितल तर मला माझे बाबा आठवतात अगदी त्याच्या सारखेच आहेत ते. माझ्या बाबांची सवय झाली आहे मला आणि का नाही झालीच आहे पण बाबांनी मला हतबल नाही केला कधी. ते नेहमी माझी ताकत बनले आहेत, त्यांनी प्रत्येक परिस्थितीत लढण शिकवल आहे आणि ते ही कुढत नाही तर अगदी आनंदानं. तर ह्या परिस्थितीत मी अशी खचणार नाही मी बाबांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःच्या नव्या आयुष्याची वाटचाल करणार आहे आणि तेव्हाच मग त्यांच्या शिकवलेल्या गोष्टीची खरी परीक्षा असेल आणि मला बाबांनी दिलेल्या आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास आहे आणि मी जिंकणार आहे.
...पिनल चौधरी