Thursday, September 23, 2010

वाट....

कोवळे दिस सरुनी जाती
नकळत त्याच्या अन माझ्या
परतुनी फिरतील ते कधी आता?

ऋतू ते सारेच सुगंधी वाटे,
त्याच्या प्रीतीच्या पावसात चिंब भिजे
परतुनी तो वारा कधी बहरेल?

गेला दूर देशी वेड लाऊनी
वेड देखील हवे वाटे
परतुनी येईल कधी माझ्या देशी?

वाट बघते न-मिटता डोळे
मिटताच क्षणी पानावते
पाणावलेले डोळे कोरडे होण्याआधी यावे!!!!!!

...पिनल चौधरी

1 comment:

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...