Wednesday, September 29, 2010

तू अन मी

चल होऊयात बेभान ह्या चढ-उतारात
बेभान होऊन मग आपलाच कल पाहुयात

न काळोख रात्री न मंतरलेली दिवसं
ना त्यांची भीती ना त्यांचा धाकात जगणं

स्वतःचेच असेल तत्व आणि स्वतःचाच मंत्र
अन मग सहजच निभाऊ आपण जगण्याचे तंत्र 

कधी असेलही आपलाच कल चुकलेला
मग त्याला सावरुयात ना.. बघू कोणला आधी जमत

अश्या जमवा जमवीत बघ कसला असतो आनंद
आणि ह्यातूनच तर आपल्याला खर आयुष्य उमगत......पिनल चौधरी!!!

No comments:

Post a Comment

पाऊल

पाऊल पुढे पडत, अगदी सवयीने पण प्रत्येक पावलावर आशा आहे पाऊलो पाउली खचते आहे पडते आहे उठते आहे कुठला गाव माझा दूरवर दिसेना अज...