Wednesday, September 29, 2010

आशेची रांगोळी

आशेची रांगोळी,
ती कधीच पूर्ण होत नसते

तिच्या थेम्ब्बांना जोडण्याचा अट्टहास
माणूस उगीच करत असतो

कधी थेंब सापडतात पण
ते काही केल्या जुडत नाही

त्यांना जोडायचा प्रयत्न असला
तर मग ती रांगोळी दिसत नाही

पण रांगोळीची शोभा तर
तिच्या रांगांनी येते

मग माणूस थेंब जोडून पण 
पुन्हा रंग्गांच्य शोधात असतो..

त्यातून पुन्हा तोच प्रवास
सुरु होतो.... न संपणारा 


....पिनल चौधरी!!!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...