Wednesday, September 29, 2010

तू उमगतच नाहीस...

तू उमगलास रे
तुझ्या रुपात..
पण ते जमवते आहे
माझा झालेल्या जगात...

समजलास... अस
वाटताच क्षणी पुन्हा
मला गोंधळात टाकतोस..
मन माझ मग हिरमुसत

ह्या समजुतीत
दूर नको लोटूस कधी
जमेल मला ही ते
जरी थोडीफार चुकली

बस मला तू आसपास
हवा आहेस
हाकेच्या अंतरावर
अंगणी मनाच्या

नको जाऊस हाके पलीकडे....
कारण मज ते नाही जमायचे
ओरडून सांगणे
तू दूर गेल्याचे..... 


...पिनल चौधरी!!!

5 comments:

 1. किती गं लिहितेस..आणि तेही भरभरून.... आवडलं खूप....!

  ReplyDelete
 2. छान वाटल तुमची comment बघून..
  तुमचा blog बघितला.... आणि वेडीच झाली आहे वाचून
  सकाळ पासून जवळ जवळ ४-५ तास झाले वाचते आहे...
  आणि पुन्हा एकदा धन्यवाद.. 

  ReplyDelete
 3. Nice one pinall...
  You keep getting better and better...

  ReplyDelete
 4. Hooka....aangani Maanchay.....
  Khup Chaan aahai rachana...

  ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...